​ही आहे राजेश शृंगारपुरेची पत्नी, बिग बॉस मराठीमध्ये रेशम टिपणीससोबत असलेल्या नात्यामुळे सध्या चर्चेत आहे राजेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 06:27 AM2018-05-11T06:27:02+5:302018-05-11T12:01:24+5:30

बिग बॉस मराठीमधील रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे यांच्यात मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी असल्याचे प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाले ...

This is Rajesh Shringarpur's wife, Big Boss is currently in talks with silk commentary in Marathi | ​ही आहे राजेश शृंगारपुरेची पत्नी, बिग बॉस मराठीमध्ये रेशम टिपणीससोबत असलेल्या नात्यामुळे सध्या चर्चेत आहे राजेश

​ही आहे राजेश शृंगारपुरेची पत्नी, बिग बॉस मराठीमध्ये रेशम टिपणीससोबत असलेल्या नात्यामुळे सध्या चर्चेत आहे राजेश

googlenewsNext
ग बॉस मराठीमधील रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे यांच्यात मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी असल्याचे प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाले होते. राजेश बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला असे घरातील सगळ्यांना वाटत आहे. पण त्याचे एलिमेनेशन झालेले नसून त्याला एका सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तो लवकरच बिग बॉसच्या घरात परतणार आहे. पण तो घरात नसल्याने रेशम चांगलीच एकटी पडली आहे. कारण रेशम आणि राजेश यांनी एकमेकांना पसंत करत असल्याची कबुली देखील बिग बॉसच्या घरात दिली होती. राजेश आणि रेशम बिग बॉसच्या घरात सतत एकत्र दिसायचे. राजेश आणि रेशम यांच्या प्रेमकथेची चर्चा असली तरी तुम्हाला माहीत आहे का राजेशचे लग्न झाले असून त्याला दोन मुली देखील आहेत. राजेश हा गोरेगावमध्ये त्याच्या पत्नी आणि दोन मुलींसोबत गेल्या अनेक वर्षांपासून राहात आहे. त्याची पत्नी ही गृहिणी असून त्यांच्या लग्नाला १२-१३ वर्षं झाली आहेत. राजेशची पत्नी मीडियापासून नेहमीच दूर राहिली आहे. तडका मराठीने नुकताच राजेशसोबतचा तिचा एक फोटो शेअर केला आहे.
रेशम ही घटस्फोटीत असून तिला दोन मुले आहे. रेशमचे लग्न छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता संजीव सेठ सोबत १९९३ला झाले होते. त्या दोघांमध्ये १२ वर्षांचे अंतर आहे. लग्न झाले त्यावेळी रेशम २० वर्षांची तर संजीव ३२ वर्षांचा होता. त्या दोघांनी २००४ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटानंतर त्यांची दोन्ही मुले संजीव सोबत राहातात. संजीवने रेशम सोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री लता सब्रवालसोबत लग्न केले. लता आणि संजीव हे अनेक वर्षांपासून रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत काम करत आहेत. ते दोघे या मालिकेत अक्षराच्या आई-वडिलांची भूमिका साकारत आहेत. त्या दोघांना एक मुलगी असून ती आता चार वर्षांची आहे.
केवळ कार्यक्रमाचा टीअारपी वाढवण्यासाठी  राजेश आणि रेशम प्रेमाचे नाटक तर करत नाही ना अशी चांगलीच चर्चा रंगली आहे. पण राजेशच्या या वागण्यावर त्याच्या पत्नीची काय प्रतिक्रिया असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. 
 
rajesh shringarpure wife pics

Also Read : बिग बॉसच्या घरातून राजेश शृंगारपुरे बाहेर पडल्यामुळे रेशम टिपणीसची झाली अशी अवस्था

Web Title: This is Rajesh Shringarpur's wife, Big Boss is currently in talks with silk commentary in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.