राहुल वैद्य पुन्हा होणार बाबा? पत्नी दिशा परमार गरोदर असल्याच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाला- "आम्हाला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:34 IST2026-03-26T16:33:38+5:302026-03-26T16:34:13+5:30

दिशा परमार पुन्हा गरोदर असल्याचं बोललं जात आहे. या चर्चांवर अखेर राहुल वैद्यने मौन सोडत नेमकं सत्य काय आहे, ते सांगितलं आहे.

rahul vaidya break silence on wife disha parmar pregnant 2nd time said this are rumours | राहुल वैद्य पुन्हा होणार बाबा? पत्नी दिशा परमार गरोदर असल्याच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाला- "आम्हाला..."

राहुल वैद्य पुन्हा होणार बाबा? पत्नी दिशा परमार गरोदर असल्याच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाला- "आम्हाला..."

सिंगर राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार हे सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहेत. राहुल आणि दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. काही वर्ष डेट केल्यानंतर राहुल आणि दिशाने २०२१ मध्ये लग्न करत संसार थाटला होता. लग्नाच्या दोन वर्षांनी त्यांच्या आयुष्यात छोट्या परीचं आगमन झालं. आता ते दोघं पुन्हा आईबाबा होणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. दिशा परमार पुन्हा गरोदर असल्याचं बोललं जात आहे. या चर्चांवर अखेर राहुल वैद्यने मौन सोडत नेमकं सत्य काय आहे, ते सांगितलं आहे.

टेलीचक्करने दिलेल्या वृत्तानुसार राहुल वैद्यने या अफवा असल्याचं म्हटलं आहे. "अजिबातच नाही...या पूर्णपणे अफवा आहेत. आम्ही आमच्या पहिल्या बाळाच्या संगोपनामध्ये व्यस्त आहोत. पण याची तुलना कोणत्याही गोष्टीबरोबर केली जाऊ शकत नाही. आम्ही दुसऱ्या बाळासाठी उत्सुक असलो तरीदेखील सध्या तरी असं काहीच नाहीये. आम्ही दुसऱ्या बाळाचा विचारही करत नाही आहोत", असं राहुलने म्हटलं आहे. 


राहुल वैद्यने 'इंडियन आयडल १' मधून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. या शोचा तो दुसरा रनर अप होता. त्यानंतर अनेक गाणी त्याने गायली. 'बिग बॉस १४'मध्येही त्याने सहभाग घेतला होता. 'खतरों के खिलाडी ११' या रिएलिटी शोमध्येही तो दिसला होता. तर दिशाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'प्यार का दर्द है', 'बडे अच्छे लगते है' या मालिकांमध्ये ती दिसली होती. 

Web Title: rahul vaidya break silence on wife disha parmar pregnant 2nd time said this are rumours