Rahul Mahajan Wedding: राहुल महाजनने तिसऱ्यांदा केले लग्न, या मॉडेलसोबत अडकला विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 16:04 IST2018-11-23T15:59:59+5:302018-11-23T16:04:11+5:30
राहुलचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. राहुलची आजवर दोन लग्नं झाली असून दोन्ही पत्नींसोबत त्याचा घटस्फोट झाला आहे. त्याची पहिली पत्नी श्वेता ही पायलट होती तर दुसरी पत्नी डिम्पी ही मॉडेल होती.

Rahul Mahajan Wedding: राहुल महाजनने तिसऱ्यांदा केले लग्न, या मॉडेलसोबत अडकला विवाहबंधनात
राहुल महाजन आणि विवाद यांचे खूपच जवळचे नाते आहे. राहुल कधी मीडियामध्ये त्याच्या नात्यासाठी तर कधी ड्रग्सच्या व्यसनासाठी चर्चेत असतो. त्याने बिग बॉस या कार्यक्रमात देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमामुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या कार्यक्रमामुळे त्याला सामान्य लोक देखील ओळखायला लागले. या कार्यक्रमानंतर तो आणखी काही रिअॅलिटी शोमध्ये झळकला होता.
राहुलचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. राहुलची आजवर दोन लग्नं झाली असून दोन्ही पत्नींसोबत त्याचा घटस्फोट झाला आहे. त्याची पहिली पत्नी श्वेता ही पायलट होती तर दुसरी पत्नी डिम्पी ही मॉडेल होती. राहुलने आता नुकतेच तिसरे लग्न केले असून त्याचे लग्न एका मॉडेलसोबत झाले आहे. नताल्या लिना असे या मॉडेलचे नाव असून ती मुळची कझाकस्थानमधील आहेत. मुंबईतील मलबार हिलमधील एका देवळात अगदी जवळच्या नातलगांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत राहुलने लग्न केले. नताल्या आणि राहुल याची काही कॉमन फ्रेंड्च्या मार्फत मैत्री झाली होती. ते दोघे गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून तीन महिन्यांपासून नात्यात आहेत. गेल्याच महिन्यात राहुलने तिला लग्नासाठी विचारले. त्यांच्या नात्याविषयी राहुल सांगतो, माझी दोन्ही लग्नं खूप घाईघाईत झाली. खरे तर श्वेता आणि डिम्पी दोघेही व्यक्ती म्हणून खूप चांगल्या आहेत. पण आम्ही एकमेकांसाठी योग्य नव्हतो असे मला नेहमी वाटते. त्यामुळे कोणत्याही नात्यात अडकायचे नाही असेच मी ठरवले होते. पण नताल्या ही माझी जोडीदार म्हणून अगदी योग्य असल्याचे मला जाणवले. आम्ही लग्न एकदम साध्या पद्धतीने करायचे असे सुरुवातीलाच ठरवले होते. एवढेच नव्हे तर माझ्या या आधीच्या नात्यांमुळे लोकांना चर्चेचा एक विषय मिळू शकतो आणि त्यामुळे लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी लग्नाबाबत सगळ्यांना सांगायचे असे मी ठरवले होते. पण ते शक्य झाले नाही. नताल्या ही हिंदू नसली तरी तिला आपले रितीरिवाज खूप आवडतात. तिने मंगळसूत्र देखील घालण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या आयुष्याची नताल्यासोबत मी एक नवी सुरुवात करत आहे.