पीपीई किट घालून राघव जुयाल कोरोनाग्रस्तांची दिवस रात्र करतोय सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 12:02 IST2021-06-02T12:02:05+5:302021-06-02T12:02:40+5:30
राघव जुयाल सध्या ‘डान्स दिवाने 3’ शोला होस्ट करत आहे.‘डान्स दिवाने 3’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत असते. त्यात राघवचा कॉमेडी अंदाज चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरतो.

पीपीई किट घालून राघव जुयाल कोरोनाग्रस्तांची दिवस रात्र करतोय सेवा
देशात कोरोनाची भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर रुग्णांना बेड,ऑक्सिजन मिळणंही मुश्किल झालं आहे. परिणामी रुग्ण दगावत आहेत. अशातच अनेक टीव्ही सेलिब्रिटीही मदतीला धावून येत आहेत. रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळणंही मुश्किल झालं आहे. अशा कठिण परिस्थितीत राघव जुयाल दिवस रात्र कोरोना रुग्णांची सेवा करत आहे.
ऑक्सीजन कंसन्ट्रेटर उपलब्ध करुन देण्याचे काम राघव करत आहे.अनेक कलाकार जमेल तशी मदत प्रत्येकजण करत आहेत. इतरांनाही या कठिण प्रसंगी जमेल तितकी मदत करण्याचे आवाहनही त्याने केले आहे. एकमेकांना मदत करत राहा, कठिण काळात एकमेकांना आधार द्या असेही तो प्रत्येकाला आवाहन करतोय.सोशल मीडिया युजर्स सगळ्यांना सकारात्मकता संदेश पसरवण्याचं आवाहनही तो करत आहे.
मध्यंतरी डान्स दिवानेच्या सेटवरही अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात राघवलाही करोनाची लागण झाली होती. खुद्द रागवने सोशल मीडियाद्वारे त्याची माहिती दिली होती. ताप आणि खोकला आल्यामुळे त्याने कोरोना चाचणी करून घेतली होती. त्यातच त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्या आणि कोरोना चाचणी करून घ्या. सर्व प्रोटोकॉल पाळा. सुरक्षित राहा’. अशा आशयाची पोस्ट राघवने केली होती.
राघव जुयाल सध्या ‘डान्स दिवाने 3’ शोला होस्ट करत आहे.‘डान्स दिवाने 3’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत असते. त्यात राघवचा कॉमेडी अंदाज चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरतो. राघव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी त्याच्या चाहत्यांपर्यंत तो पोहचवत असतो. त्यामुळे कोरोना काळातही त्याचे कार्य पाहून चाहते त्याचे भरभरुन कौतुक करत आहेत.