काय सांगता! शक्तीला नाही तर या परदेशी मुलीला डेट करतोय डान्सर राघव जुयाल? हे फोटो आहेत पुरावा....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 18:10 IST2021-12-11T18:07:01+5:302021-12-11T18:10:56+5:30
राघव जुयाल (Ragha juyal कुणाला तरी डेट करतोय अशी चर्चा आहे पण ती शक्ती नाही.

काय सांगता! शक्तीला नाही तर या परदेशी मुलीला डेट करतोय डान्सर राघव जुयाल? हे फोटो आहेत पुरावा....
डान्सर, अभिनेता आणि रिअॅलिटी शोचा होस्ट राघव जुयाल (Ragha juyal) हा जिंदादील व्यक्ती आहे. राघवला प्रवासाची आवड आहे. तो मस्तीखोर सुद्धा आहे. राघव जुयाल त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच मौन बाळगतात. राघवच्या लव्ह लाईफबद्दल अनेकदा अफवा पसरल्या आहेत. पण त्याने कधीच दुजोरा दिला नाही.आता कळते की राघव जुयाल (Ragha juyal कुणाला तरी डेट करतोय अशी चर्चा आहे पण ती शक्ती नाही.
राघव स्वीडिश मुलीला करतोय डेट?
राघव जयल एका स्वीडिश मुलीला डेट करत असल्याची चर्चा आहे. स्वीडनच्या या मुलीचे नाव Sara Arrhusius आहे. सारा फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत आहे आणि इंटिमसी कोऑर्डिनेटर आहे. साराने नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध शो 'यंग रॉयल्स'मध्ये इंटीमसी कोऑर्डिनेटर म्हणून काम केले आहे. याशिवाय तिने इतर अनेक स्वीडिश शोमध्ये काम केले आहे.
राघव आणि सारा 2018 पासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. Sara Arrhusius च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर अंदाज येतो की दोघे 2017 पासून रिलेशनशीपमध्ये असावेत. सारा आणि राघव यांनी त्यांचे नाते सीक्रेट ठेवले असावं. दोघांच्या नात्याबद्दल फक्त जवळच्या मित्रांनाच माहिती आहे. सारा अनेकदा भारतात आली आहे. ती एका फर्मची सह-संस्थापकही आहे.
भारतात झाली दोघांची भेट
आजतकच्या रिपोर्टनुसार "दोघेही भारतात ट्रेक दरम्यान भेटले होते. सारा तिच्या आईसोबत भारत दौऱ्यावर आली होती. ट्रेकिंगदरम्यान दोघेही प्रेमात पडले. दोघांच्या आवडीनिवडी समान आहेत आणि ते एकमेकांना समजून घेतात.सारा अनेकदा भारतात येते जात असते.