पापा बाय चान्समध्ये रफ्तार करणार रॅप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 14:37 IST2018-07-25T14:31:03+5:302018-07-25T14:37:00+5:30
आपल्या मस्त उडत्या चालींवर लोकांना डान्स करायला लावल्यानंतर रफ्तार आता भारतीय टेलिव्हिजनवर स्क्रीन धमाका उडवणार आहे.

पापा बाय चान्समध्ये रफ्तार करणार रॅप
मनोरंजनाची पुनर्व्याख्या करत स्टार भारतने नावाजलेला सेलेब्रिटी रॅपर रफ्तारसह नवीन उंची गाठली आहे. वाहिनीने नेहमी वेगळ्या संकल्पना आणि अभिनव कल्पनांसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि त्यांचे मनोरंजन केले आहे. ह्या ट्रेंडला जीवंत ठेवत ब्रॅन्डने आता रफ्तारला आपला आगामी शो पापा बाय चान्सच्या पहिल्या प्रोमोसाठी रॅप करण्याकरिता आणले आहे.
आपल्या मस्त उडत्या चालींवर लोकांना डान्स करायला लावल्यानंतर रफ्तार आता भारतीय टेलिव्हिजनवर स्क्रीन धमाका उडवणार आहे. स्टार भारतवरील आगामी कौटुंबिक मालिका पापा बाय चान्समधील बिनधास्त दिल्ली बॉय युवानची ओळख करून देताना रफ्तार रॅपिंग करेल. वाहिनीने एखाद्या व्यक्तिरेखेची ओळख अशा पद्धतीने फारच कमी वेळा केली असेल. वाहिनीने शोधून काढलेला झेबी सिंग हा युवानच्या व्यक्तिरेखेसाठी अगदी अनुरूप असून युवानला वर्तमानात जगायला आवडते आणि
नातेसंबंधांमध्ये फार न गुरफटणे हा त्याचा मंत्र आहे। देखणा मॉडेल झेबी पापा बाय चान्समधून अभिनयामध्ये पदार्पण करत आहे.
आपल्या ह्या नवीन कामाबद्दल उत्साहात असलेला रफ्तार म्हणाला, “एका फिक्शन टीव्ही शोसोबत मी प्रथमच संलग्न होत असून मला स्टार भारतसोबत काम करण्याबद्दल आनंद होत आहे. ह्यामुळे मला नव्या संधीचा शोध घ्यायला मिळत आहे. पापा बाय चान्समधील नायक युवानची ओळख करून देणारे हे रॅप रेकॉर्ड करताना मला खूप मजा आली. ह्या रॅपचा टोन अतिशय कॅची असून मला विश्वास आहे की लोक हा पुन्हा पुन्हा ऐकतील.”