"राधा प्रेम रंगी रंगली"मध्ये "राधा"च्या आयुष्यात येणार नवं वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 16:20 IST2018-11-12T16:10:53+5:302018-11-12T16:20:38+5:30
दीपिकाच्या प्रत्येक डावाला आणि कारस्थानाला ती उत्तर देताना प्रेक्षकांना दिसणार आहे. माधुरीची प्रकृती अचानक बिघडल्याने प्रेमला प्रेम-माधुरीला न्युझीलंडला जावे लागले.

"राधा प्रेम रंगी रंगली"मध्ये "राधा"च्या आयुष्यात येणार नवं वळण
कलर्स मराठीवरीलराधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये राधा – प्रेमच्या आयुष्यात आजवर बऱ्याच घटना घडल्या... दीपिका आणि देवयानीचा राधाला जीवे मारण्याची डाव असो वा राधा – प्रेमला कायमचे दूर करण्यासाठी रचलेले कारस्थान असो... वा दीपिकाने खोट्याचा आधार घेऊन प्रेमला आपलसं करण्याचा केलेला प्रयत्न असो... सगळेच राधाने मोठ्या धीराने आणि हिमतीने सहन केले... प्रत्येक संकटाला सामोरी गेली... अत्यंत समजूतदारापणे परिस्थिती हाताळली... आता राधाने दीपिकाच्या प्रत्यके कारस्थानाला उत्तर देण्याचे ठरवले आहे...राधा दीपिका विरोधात ठामपणे आणि खंबीरपणे उभी राहिलेली प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे... दीपिकाच्या प्रत्येक डावाला आणि कारस्थानाला ती उत्तर देताना प्रेक्षकांना दिसणार आहे... माधुरीची प्रकृती अचानक बिघडल्याने प्रेमला प्रेम- माधुरीला न्युझीलंडला जावे लागले.. आणि हे घडतच दीपिकाने तिचे डाव खेळण्यास सुरुवात केली परंतु आता दीपिकासमोर राधा खंबीरपणे उभी असल्याने दीपिका कुठला पलटवार करणार ? कोणती नवी खेळी खेळणार ? आणि राधा त्याला कसे आणि काय उत्तर देणार ?
मालिकेमध्ये आता राधा पर्व सुरु झाले आहे असे म्हणायला हरकत नाही... राधा घराबरोबरच व्यवसाय देखील आता सांभाळू लागली आहे. दीपिकाने दिवाळीच्या वेळेस राधाच्या वडिलांना अटक करवून आणली आणि नंतर तिनेच त्यांना सोडवले देखील हे करून दीपिकाने राधाच्या कुटुंबाचा विश्वास मिळवला.. परंतु दीपिकाचा हा डाव होता हे मात्र राधाला कळून चुकले... राधा आता खंबीर झाल्याने दीपिका नक्कीच पलटवार करणार हे निश्चित... राधाच्या घरच्यांना तिच्याच विरुध्द करण्याचा दीपिकाचा डाव यशस्वी होईल ? राधा याला काय उत्तर देईल ? इतकेच नसून दीपिका लवकरच लग्न करून राधा राहात असलेल्या चाळीमध्ये राहायला येणार आहे ... तेव्हा मालिकेमध्ये पुढे काय होईल ? राधा कशी दीपिकाला मात देईल ? दीपिका कुठली नवी खेळी खेळेल ? हे बघणे रंजक असणार आहे.