‘कुर्बान हुआ’मधील अभिनेता राजवीर सिंगला झाली कोरोनाची लागण, घरीच घेतोय उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 17:46 IST2021-04-23T17:46:12+5:302021-04-23T17:46:30+5:30
ही महामारी एक गंभीर परिस्थिती असून आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. मी सर्वांना विनंती करतो की मास्क लावा आणि सोशल डिस्टंसिंग पाळा आणि अगदी गरज असेल तरच घराबाहेर पडा.

‘कुर्बान हुआ’मधील अभिनेता राजवीर सिंगला झाली कोरोनाची लागण, घरीच घेतोय उपचार
झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुर्बान हुआ’ सुरूवातीपासूनच नील (राजवीर सिंग) आणि चाहत (प्रतिभा रांता) यांच्या आयुष्यातील रंजक वळणांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकत्याच घेण्यात आलेल्या ५ वर्षांच्या लीपनंतर आता मालिका वेगळ्याच रंजक वळणावर येऊन पोहचली आहे.
राजवीर सिंग नीलच्या रूपात आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून शो साठी अविरत काम करत आहे. ह्या गेल्या वीकेन्डला मात्र तो कोविड १९ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील दोन आठवडे त्याला घरीच क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तो आपल्या घरी क्वारंटाईनमध्ये असला तरी त्याने आपला दृष्टीकोन सकारात्मक कसा ठेवता येईल यावरच जास्त लक्ष देत आहे. असून बरा झाल्यावर लगेच कामाला सुरूवात करण्याची त्याची इच्छा आहे.
‘कुर्बान हुआ’मधील नीलची भूमिका करणारा राजवीर म्हणाला, “मी सध्या होम क्वारंटाईनमध्ये असून डॉक्टरांनी आणि महापालिकेने सांगितलेल्या सर्व गोष्टी पाळत आहे. १४ दिवसांचा हा समय मी माझ्या स्वतःवर माझ्या आरोग्यावर आणि माझ्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यात व्यतीत करेन. ही महामारी एक गंभीर परिस्थिती असून आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. मी सर्वांना विनंती करतो की मास्क लावा आणि सोशल डिस्टंसिंग पाळा आणि अगदी गरज असेल तरच घराबाहेर पडा.
आपले हात वारंवार धुवत राहा. मी ‘कुर्बान हुआ’चा सेट नक्कीच मिस करत आहे आणि लवकरात लवकर पुन्हा एकदा कामामध्ये रूजू होऊन सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी उत्सुक आहे. अर्थात मी कोविडमुक्त आणि काम करण्याााठी तंदुरूस्त असेन तेव्हाच हे होईल.”