​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवर जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी आणि बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता यांच्यात झाली भांडणं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 11:30 IST2017-10-19T05:59:57+5:302017-10-19T11:30:08+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत जेठालालचे दयासोबत लग्न झाले असले तरी त्याला बबिता आवडत असल्याचे आपल्याला पाहायला ...

The quarrel between Jaitalal, Dilip Joshi and Babita, or Munmun Dutta on the sets of Tarak Mehta's reverse chakra series? | ​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवर जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी आणि बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता यांच्यात झाली भांडणं?

​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवर जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी आणि बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता यांच्यात झाली भांडणं?

रक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत जेठालालचे दयासोबत लग्न झाले असले तरी त्याला बबिता आवडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तो अनेकवेळा तिच्या मागे-पुढे करत असतो. ही मालिका गेली सात-आठ वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून ही गोष्ट आपल्याला मालिकेत सुरुवातीपासून पाहायला मिळत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, मालिकेत जेठालाल बबिताच्या प्रेमात असला तरी खऱ्या आयुष्यात या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी आणि बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता यांचे एकमेकांशी तितकेसे पटत नसल्याचे म्हटले जाते. स्पॉटबॉयइ या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार तर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवर नुकताच दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला होता. 
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची आवडती असल्याने अनेकजण गोरेगाव फिल्म सिटीमधील या मालिकेच्या सेटला भेट देत असतात. या मालिकेतील कलाकार देखील आपल्या फॅन्ससोबत गप्पा मारतात, त्यांच्यासोबत फोटो काढतात. नुकतेच दिलीप जोशीच्या ओळखीचे काही लोक तारक मेहताच्या सेटवर आले होते. हे सगळेच मुनमुन दत्ताचे खूप मोठे फॅन होते आणि त्यामुळे त्यांना तिच्यासोबत फोटो काढायचे होते. मुनमुनला फोटो काढायला आपण विचारण्यापेक्षा दिलीपने विचारले तर ती लगेचच तयार होईल असे त्या लोकांना वाटत असल्याने त्यांनी याविषयी दिलीपला सांगितले. त्यामुळे त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी दिलीपने मुनमुनला विनंती केली. पण मुनमुनने त्याकडे लक्षच दिले नाही. यामुळे दिलीपच्या ओळखी लोकांची चांगलीच निराशा झाली. 
स्पॉटबॉयइ या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार या घटनेनंतर मालिकेच्या टीमबद्दल लोकांमध्ये तू एक चुकीचा मेसेज दिला असल्याचे दिलीपने मुनमुनला सुनावले. तसेच मुनमुन छोट्या छोट्या कारणांनी सगळ्यांना अॅटीट्युड दाखवत असल्याचे देखील जेठालाने तिला बोलून दाखवले अशी चर्चा आहे.
आता मालिकेच्या टीमवर दिलीप आणि मुनमुनची भांडणे झाले की ही केवळ अफवा आहे हे आपल्याला केवळ दिलीप आणि मुनमुनच सांगू शकतात.  

Also Read : तारक मेहता का उल्टा चष्मामधील दया म्हणजेच दिशा वाकानीच्या ओटीभरणाला उपस्थिती लावली तिच्या ऑनस्क्रीन मुलाने

Web Title: The quarrel between Jaitalal, Dilip Joshi and Babita, or Munmun Dutta on the sets of Tarak Mehta's reverse chakra series?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.