‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ फेम स्रेहलता वसईकरने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक, ‘हे’ आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 14:29 IST2021-10-18T14:26:41+5:302021-10-18T14:29:18+5:30
Snehlata Vasaikar : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत सोयरा बाईसाहेबांची स्रेहलताने साकारलेली भूमिका विशेष गाजली होती.

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ फेम स्रेहलता वसईकरने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक, ‘हे’ आहे कारण
‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेत अहिल्याबाईच्या सासूबाईची म्हणजे गौतमाबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्रेहलता वसईकर (Snehlata Vasaikar ) आता काही काळ सोशल मीडियावर दिसणार नाहीये. होय, स्रेहलताने काही काळ सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत, तिने खुद्द ही माहिती दिली.
‘अध्यात्मिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी काही काळ ऑफलाइन जात आहे,’ अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. अध्यात्मिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याची गरज स्रेहलताला का पडावी, हे तिलाच ठाऊक़ पण स्रेहलताच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी तिच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलेआहे तर काहींनी तिच्या या निर्णयाचें कौतुकही केले आहे.
स्रेहलता ही टीव्ही जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘फु बाई फु’ मधून तिने मराठी सृष्टीत पदार्पण केले होते. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत सोयरा बाईसाहेबांची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली होती. या भूमिकेने स्रेहलता घराघरात पोहोचली.
संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात तिने साकारलेल्या भानूच्या भूमिकेचेही प्रचंड कौतुक झाले होते. काही हिंदी मालिकेतून अभिनय साकारत असताना तिने ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय काही शोचे सूत्रसंचालन केले होते.
स्नेहलता वसईकर हिचे माहेरचे नाव स्रेहलता तावडे. गिरीश वसईकर या दिग्दर्शकासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर ती स्रेहलता वसईकर झाली. तिला शौर्या नावाची एक मुलगी आहे. स्रेहलता तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जातेच. शिवाय फिटनेससाठीही ती ओळखली जाते.