‘सोनी सब’वरील ‘सजन रे झूठ मत बोलो’मध्ये होणार कुशल पंजाबीची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 16:02 IST2018-04-03T10:32:18+5:302018-04-03T16:02:18+5:30
सजन रे झूठ मत बोलो या मालिकेच्या यशानंतर या मालिकेचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले. या दुसऱ्या पर्वाला देखील ...
‘सोनी सब’वरील ‘सजन रे झूठ मत बोलो’मध्ये होणार कुशल पंजाबीची एंट्री
स न रे झूठ मत बोलो या मालिकेच्या यशानंतर या मालिकेचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले. या दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या पर्वात सुमीत राघवन मुख्य भूमिकेत होता तर आता दुसऱ्या पर्वात हुसैन कुवार्जेवाला मुख्य भूमिका साकारत आहे. गुंतवून ठेवणारे कथानक आणि सादरीकरणामुळे ‘सजन रे झूठ मत बोलो’ या ‘सोनी सब’वरील मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगल्याच भावत आहेत. आता या मालिकेच्या आगमी भागात जय आणि जया या आपल्या आवडत्या ऑनस्क्रीन जोडीच्या आयुष्यातील काही मनोरंजक घडामोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. आता या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे. येत्या काही भागात आपण कुंदनला (कुशल पंजाबी) लोखंडे हाउसमध्ये प्रवेश करताना पाहणार आहोत. कुशल एका प्रगाढ आणि ज्ञानी माणसाच्या भूमिकेत दिसेल. जय (हुसैन कुवार्जेवाला) आणि जयाच्या (पार्वती वझे) बहरणाऱ्या प्रेमकथेत तो अडथळा निर्माण करणार आहे. जय पुन्हा जयाचे मन जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. पण जयच्या ऐवजी जया कुंदनची निवड करणार आहे. त्यामुळे तो खूपच दुखावला जाणार आहे तर दुसरीकडे लोखंडे हाऊसमध्ये प्रवेश करण्यामागे कुशलचा एक डाव आहे. लोखंडे हाउसचा आणि चोप्राच्या आयुष्याचा भाग होण्यामागचा कुंदनचा खरा उद्देश काय आहे? जया कुंदनशी लग्न करणार का? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये मिळणार आहेत. कुंदन या आपल्या भूमिकेविषयी कुशल पंजाबी सांगतो, “कुंदन हा जयाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणार आहे. तो उच्च शिक्षित असून अतिशय चांगल्या कुटंबातील आहे. त्यामुळे कुंदनसोबत लग्न करायला जया तयार होणार आहे. मालिकेतील या लव्ह ट्रँगलमुळे प्रेक्षकांना मालिका पाहायला मजा येणार आहे. या मालिकेतील माझे पात्र खूप रहस्यमय आहे आणि प्रेक्षकांना सुरुवातीला माझ्या हेतूंचा अंदाजच येणार नाही. प्रेक्षकांना सजन रे झूठ मत बोलो या मालिकेतील आगामी ट्रॅक आवडेल अशी मला खात्री आहे.”
Also Read : तुम्हाला माहीत आहे का राखी विजन आणि हुसैन कुवार्जेवाला यांनी हम पाचमध्ये केले होते एकत्र काम
Also Read : तुम्हाला माहीत आहे का राखी विजन आणि हुसैन कुवार्जेवाला यांनी हम पाचमध्ये केले होते एकत्र काम