पुणे हे माझे पहिले घर आहे : रवींद्र मंकणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 22:30 IST2016-06-21T17:00:07+5:302016-06-21T22:30:07+5:30
‘स्वामी’ या गाजलेल्या मालिकेतील श्रीमंत महादेवराव पेशव आठवताहेत?? ‘शांती’मधील सिद्धार्थ सिंघानिया किंवा ‘झाले मोकळे आकाश’मधील श्रीरंग देशमुख आठवताहेत? या ...

पुणे हे माझे पहिले घर आहे : रवींद्र मंकणी
प्रश्न : ‘रिश्तों का सौदागर-बाझीगर’ या मालिकेत आपण आहात. ही मालिका का स्वीकारली आणि यातील आपली नेमकी भूमिका काय?
रवींद्र मंकणी : मी ही मालिका स्वीकारली ते केवळ वाहिनीमुळे. ऐकायला हे जरा विचित्रही वाटेल. पण ‘लाईफ ओके’ या वाहिनीवरील मालिका दर्जेदार व मनोरंजक असतात, हे माझे स्वत:चे निरीक्षण आहे. या मालिकेत मी आजोबाची भूमिका साकारली आहे. नातीवर अतिशय प्रेम करणारा आजोबा. तिच्या आयुष्यात सगळे काही चांगले होवो, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करणारा आजोबा मी साकारला आहे. भूमिका परिपक्व होती. मला ती आवडली आणि मी तिच्यासाठी होकार दिला.
प्रश्न : या भूमिकेसाठी अशी काही खास तयारी केलीत?
रवींद्र मंकणी : नाही, तशी काही खास तयारी केलेली नाहीच. कारण डेली सोपसाठी चित्रीकरण म्हणजे तासभर आधी स्क्रिप्ट हाती येते. त्यामुळे तयारी करायला तसाही फारसा वाव नसतोच. केवळ दिग्दर्शक आणि क्रिएटीव्ह हेडशी माझ्या व्यक्तिरेखेबद्दल चर्चा केली तेवढंच. कारण त्यांच्या डोक्यात व्यक्तिरेखेचं चित्र अगदी पक्क होतं. मी ते माझ्या अभिनयातून रंगवतोयं, एवढचं.
प्रश्न : आपण अजून आजोबा झालेला नाहीत. पण पडद्यावर आजोबा झालात. हा अनुभव कसा राहिला?
रवींद्र मंकणी : होय, अद्याप मी आजोबा झालेलो नाही. पण भूमिका माझ्या वयाला अनुसरून होती आणि मला ती मनापासून आवडली. पडद्यावर ती जगतानाचा अनुभव चांगलाच राहिला. शोमधील अख्ख्ये कलाकारांशी माझी चांगली गट्टी जमलीयं. वेळ मिळेल तेव्हा आमच्यात मस्तपैकी गप्पांचा फड रंगतो.
प्रश्न : या मालिके व्यतिरिक्त आणखी कुठल्या प्रोजेक्टवर आपण काम करीत आहात?
रवींद्र मंकणी : सध्या तरी या मालिकेवर मी माझे लक्ष केंद्रीत केले आहे. याव्यतिरिक्त कुठलाही प्रोजेक्ट माझ्या हातात नाही. शूटींग असली की मुंबई. ऐरवी मी पुण्यात असतो. वेळ मिळाला की मी पुणे गाठतो.
प्रश्न : पुण्यावर इतके प्रेम, यामागे काही खास कारण??
रवींद्र मंकणी : खास असे कारण नाही. पण माझा जन्म पुण्यातला. मी येथेच लहानाचा मोठा झालो. माझे इंजिनिअरिंगचे शिक्षणही पुण्यातच झाले आहे. जुने पुणे आणि आत्ताचे बदलते पुणे, हे स्थित्यंतर मी पाहिले, अनुभवले आहे. पुण्याच्या संस्कृतीवर माझे मनापासून प्रेम आहे. वेळ मिळेल तेव्हा मी पुण्याला धाव घेतो, कारण पुणे हे माझे पहिले घर आहे. माझे आॅफिसही येथे आहे.
प्रश्न : मराठी वा हिंदी सिनेमा यापैकी आपण कशाची निवड कराल?
रवींद्र मंकणी : या प्रश्नाचे उत्तर तसे कठीण आहे. मला दोन्ही सिनेमांत काम करायला आवडेल. मराठी ही माझी मातृभाषा तर हिंदी ही माझी व्यावसायिक भाषा. पण खरं सांगू,मराठी नाटक करायला मला अधिक आवडतं.
प्रश्न : मराठी चित्रपटसृष्टी सध्या बहरते आहे, आपल्याला काय वाटते?
रवींद्र मंकणी : निश्चित, मराठी चित्रपटसृष्टी अतिशय उत्तम काम करीत आहे. वेगळ्या विषयाचे, वेगळ्या धाटणीचे चित्रपट येत आहेत. नवे विषय, नवे कलाकार, नवे तंत्र असले तरी त्यातील परिपक्तवता जाणवणारी आहे. मला याचा मनस्वी आनंद आहे.
प्रश्न : प्रेक्षकांनी आपल्यावर भरभरून प्रेम केले. आपल्या चाहत्यांना काय सांगू इच्छिता??
cnxoldfiles/strong> मी सर्वोत्तम काम करावे, हीच माझ्या चाहत्यांची इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छेचा मान राखणे हे माझे कर्तव्य आहे. मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे निभवेल. माझी नवी मालिका आणि त्यातील माझी भूमिका प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा करतो. प्रेक्षकांचे प्रेम असेच मिळत राहो,अशी कामना करतो.