अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघाती मृत्यू; मित्रानेही गमावले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 11:08 IST2021-09-21T11:06:50+5:302021-09-21T11:08:57+5:30

Car accident: गाडी खाडीत कोसळ्यानंतर ईश्वरी आणि शुभमच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

pune actress ishwari deshpande and her friend shubham degde died in car accident | अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघाती मृत्यू; मित्रानेही गमावले प्राण

अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघाती मृत्यू; मित्रानेही गमावले प्राण

ठळक मुद्देशुभम देगडे आणि ईश्वरी करणार होते लग्न 

पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिचा मित्र शुभम देडगे यांचा गोव्यातील बागा-कलंगुट येथे अपघाती मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटे (२० सप्टेंबर) हा अपघात झाला असून गाडी खाडीत कोसळ्यानंतर ईश्वरी आणि शुभमच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. संबंधित अभिनेत्रीने अलिकडेच एका हिंदी आणि मराठी चित्रपटाचं चित्रीकरण केलं होतं. अशात हा अपघात घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोमवारी पहाटे ईश्वरी आणि शुभम गोव्यातील बागा-कलंगुट येथील पुलावरुन जात होते. मात्र, यावेळी गाडीवरील ताबा सुटल्यामुळे त्यांची गाडी खाडीत कोसळली. याचवेळी गाडीचं सेंट्रल लॉक झाल्यामुळे दोघंही गाडीत अडकले. परिणामी, नाकातोंडात पाणी गेल्यामुळे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कोण आहे ईश्वरी देशपांडे?

ईश्वरी देशपांडे मराठी अभिनेत्री असून तिने काही मालिकांमध्येही काम केलं आहे. मराठीसोबतच ती काही हिंदी मालिकांमध्येही झळकली होती. अलिकडेच तिने तिच्या हिंदी आणि मराठी अशा दोन मालिकांचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. 

शुभम देगडे आणि ईश्वरी करणार होते लग्न 

शुभम देगडे आणि ईश्वरी हे दोघं गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. बरीच वर्ष एकमेकांना ओळखत असलेल्या या जोडीचं प्रेमात रुपांतर झालं आणि ते एकमेकांना डेट करु लागले होते. विशेष म्हणजे पुढच्या महिन्यात ते दोघं साखरपुडा करणार असल्याचं म्हटलं जातं.  मात्र, संसार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा संसार मोडला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ईश्वरी ही पाषाण-सूस परिसरात वास्तव्याला होती. तर शुभम हा नांदेड सिटी परिसरातील रहिवासी होता.

Web Title: pune actress ishwari deshpande and her friend shubham degde died in car accident