पुनितची मस्क्युलर बॉडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 10:30 IST2016-09-30T05:00:22+5:302016-09-30T10:30:22+5:30

बडे दूर से आये है या मालिकेतील हेमंत म्हणजेच पुनित तलरेजा सगळ्यांनाच खूप आवडतो. त्याच्या कॉमिक टायमिंगचे नेहमीच कौतुक ...

Punchy Muscular Body | पुनितची मस्क्युलर बॉडी

पुनितची मस्क्युलर बॉडी

े दूर से आये है या मालिकेतील हेमंत म्हणजेच पुनित तलरेजा सगळ्यांनाच खूप आवडतो. त्याच्या कॉमिक टायमिंगचे नेहमीच कौतुक केले जाते. ही मालिका सुरू होऊन जवळजवळ दोन वर्षं झाले आहेत. मालिकेच्या सुरुवातीला पुनित खूपच बारीक होता. पण आता त्याने आपले 30 किलो वजन वाढवले असून चांगली शरीरयष्टीदेखील कमवली आहे. याविषयी पुनित सांगतो, "मी अतिशय बारीक असल्याने मला मालिकेत, चित्रपटात कोणीच घेणार नाही असे मला सगळेच म्हणायचे. काहीजण तर माझ्या बारीक असण्यावर हसायचेदेखील. त्यामुळे मी काहीही करून वजन वाढवणार असे ठरवले. 2010मध्ये माझे वजन केवळ 52 किलो होते. पण आता माझे वजन 82 किलो झाले आहे. वजन वाढवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. मी आठवड्यातून पाच वेळा तरी जिममध्ये जातो. तसेच मी माझ्या कामात कितीही व्यग्र असलो तरी ठरलेल्या वेळात खातो. या सगळ्यामुळेच मला माझी शरीरयष्टी पिळदार बनवता आली आहे." 

Web Title: Punchy Muscular Body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.