लग्नाआधीच झाली होती प्रेग्नंट, प्रेमासाठी सोडलं होतं घर; फारच कॉन्ट्रोवर्शिअल आहे या अभिनेत्रीचं आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 11:24 IST2022-12-26T11:21:52+5:302022-12-26T11:24:18+5:30

Puja Banerjee Biography: फार कमी वयात पूजाने अशी चूक केली ज्याचा तिला नंतर फार पश्चाताप झाला. त्यावेळी ती एका तरूणाच्या प्रेमात पडली होती. इतकी की, त्याच्यासाठी तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला.

Puja Banerjee biography actress ran away from home at the age of 15 and pregnant before marriage | लग्नाआधीच झाली होती प्रेग्नंट, प्रेमासाठी सोडलं होतं घर; फारच कॉन्ट्रोवर्शिअल आहे या अभिनेत्रीचं आयुष्य!

लग्नाआधीच झाली होती प्रेग्नंट, प्रेमासाठी सोडलं होतं घर; फारच कॉन्ट्रोवर्शिअल आहे या अभिनेत्रीचं आयुष्य!

Puja Banerjee Biography: पूजा बॅनर्जी टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठं नाव झाली आहे. पूजाला सगळ्यात जास्त लोकप्रियता 'देवों के देव महादेव' मालिकेने दिली होती. ज्यात तिने पार्वतीची भूमिका केली होती. पूजाच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक झालं आहे, पण सोबतच ती तिच्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. फार लहान वयात तिने असा निर्णय घेतला, ज्याचा नंतर तिला पश्चातापही झाला. 15 वर्षांची असताना ती घरातून पळून गेली होती. ज्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिच्यासोबत नातं तोडलं होतं.

फार कमी वयात पूजाने अशी चूक केली ज्याचा तिला नंतर फार पश्चाताप झाला. त्यावेळी ती एका तरूणाच्या प्रेमात पडली होती. इतकी की, त्याच्यासाठी तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती घरातून पळून गेली. पण काही दिवसांनी तिला समजलं की, तिच्याकडून मोठी चूक झाली. तेच तिच्या या निर्णयाने तिच्या घरातीलही खूप नाराज झाले होते.

2013 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर पूजा कामात बिझी झाली. पण नंतर तिच्या आयुष्यात कुणाल वर्माची एंट्री झाली. जो तिच्यासोबत तुझ संग प्रीत लगाई सजना मालिकेत होता. कुणाल आणि पूजा शूटिंग दरम्यान जवळ आले. दोघेही एकमेकांना डेट करत होते. 2020 मध्ये पूजा आणि कुणालने लग्न केलं. लग्नाच्या सहाच महिन्यानंतर पूजाने मुलाला जन्म दिला. यावरून हे स्पष्ट होतं की, ती लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती. पूजा आणि कुणाल दोघेही सध्या कामात बिझी आहेत. दोघेही साऊथ आणि बंगाली सिनेमात काम करत आहेत.

Web Title: Puja Banerjee biography actress ran away from home at the age of 15 and pregnant before marriage