करण जोहर मारायला प्रियांका चोप्राला आवडते
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 16:41 IST2017-12-30T11:11:15+5:302017-12-30T16:41:15+5:30
आपल्या आयकॉनिक परफॉर्मन्सेससह जगभरातील प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या ह्या बॉलिवूड सुंदरीने स्टार प्लसवरील आगामी रिअॅलिटी शो इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्सच्या प्रथम ...

करण जोहर मारायला प्रियांका चोप्राला आवडते
आ ल्या आयकॉनिक परफॉर्मन्सेससह जगभरातील प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या ह्या बॉलिवूड सुंदरीने स्टार प्लसवरील आगामी रिअॅलिटी शो इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्सच्या प्रथम एपिसोडमध्ये नुकतीच उपस्थिती लावली.
प्रत्येकच बॉलिवूड बफप्रमाणे पीसीनेही सांगितले की किंग खानचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा तिचा सर्वांत आवडता चित्रपट असून त्यात तिचा दिग्दर्शक मित्र करण जोहरही होता. तिने हा चित्रपट अनेकवेळा पाहिला असून एका दृश्यात करण, शाहरूख आणि आयकॉनिक दिवंगत अभिनेता श्री.अमरिश पुरी एकाच फ्रेममध्ये होते. ते दृश्य इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्समध्ये पुन्हा निर्माण करण्यात आले, ज्यात करण अमरिश पुरी यांच्या दुकानातून बीअर आणायला जातो आणि अमरिश पुरी त्याला नाही म्हणतात। मग शाहरूख करणला टपली मारतो आणि स्वतःचे भाग्य आजमवायला दुकानात जातो.
ह्या दृश्यात रोहित शेट्टी अमरिश पुरीजी, करण जोहर स्वतःची भूमिका तर प्रियांका शाहरूख खानच्या रूपात होते. हे दृश्य संपल्यानंतर ह्या विशेष चित्रपटाच्या आठवणींवर चर्चा होऊ लागली. तेव्हा प्रियांकाने हे प्रांजळपणे कबूल केले की तिला करण जोहरला अशी टपली मारण्याची तो चित्रपट पाहिल्यापासूनच इच्छा होती. प्रियांकाच्या उपस्थितीमुळे सेटवरील वातावरणाला न्यारी रंगत आली होती.
प्रियांकाने एका या दरम्यान एक अनुभव ही शेअर “चित्रपटसृष्टीत मी प्रवेश केला. त्यावेळी सुरुवातीला मी खूपच वाईट डान्सर होते. मला आठवतंय एका नृत्याच्या शॉटसाठी मला ५५ टेक्स द्यावे लागले होते. राजू खान त्या गाण्याचे कोरियोग्राफर होते आणि ते मला म्हणाले होते की, मला ते नृत्य करायला अजिबातच जमणार नाही. मला असं म्हणून ते चक्क निघून गेले होते. त्यामुळे मी त्या दिवसानंतर माझ्या नृत्यावर प्रचंड मेहनत घेतली आणि मी चांगली डान्सर होऊ शकते हे सिद्ध केले.
ALSO READ : प्रियांका चोप्राच्या या ड्रेसची किंमत तुम्हाला माहिती आहे का ?