'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रियदर्शन जाधव बजावतोय तिहेरी भूमिका, म्हणाला - "तोच आनंद पुन्हा देऊ.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:28 IST2025-07-22T12:27:40+5:302025-07-22T12:28:02+5:30

Priyadarshan Jadhav : 'चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गॅंगवॉर' या नव्या पर्वात प्रियदर्शन जाधव आपल्या भेटीला येत आहेत आणि यावेळी तो एक दोन नाही तर तिहेरी भूमिकेत झळकणार आहे.

Priyadarshan Jadhav is playing a triple role in 'Chala Hawa Yeu Dya', said - "I will give you that same joy again.." | 'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रियदर्शन जाधव बजावतोय तिहेरी भूमिका, म्हणाला - "तोच आनंद पुन्हा देऊ.."

'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रियदर्शन जाधव बजावतोय तिहेरी भूमिका, म्हणाला - "तोच आनंद पुन्हा देऊ.."

'चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गॅंगवॉर' (Chala Hawa Yeu Dya - Comedycha Gangwar) या नव्या पर्वात अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav) आपल्या भेटीला येत आहेत आणि यावेळी तो एक दोन नाही तर तिहेरी भूमिकेत झळकणार आहे. तो लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा भूमिका बजावताना दिसणार आहे. चित्रपट, रंगमंच, वेब सिरीज अशा विविध माध्यमांतून आपली खास छाप पाडणारा हा बहुरंगी कलाकार नेहमीच नवं काहीतरी घेऊन येतो. अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन अशा तिन्ही क्षेत्रांत यशस्वी कारकीर्द घडवलेले प्रियदर्शन आता पुन्हा आपल्या हास्याच्या भरगच्च मेजवानीसाठी सज्ज झाला आहे. 

प्रियदर्शन म्हणाला की,"जेव्हा 'फु बाई फु' सुरु होत तेव्हापासूनच मी या टीमचा भाग होतो, पण काही कारणामुळे मला तो प्रवास पुढे नेता आला नव्हता. पण जेव्हा मला 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वासाठी विचारण्यात आले तेव्हा वाटलं की पुन्हा घरी परतत आहे. माझ्या करिअरमध्ये झी मराठीचा मोलाचा वाटा आहे. तयारीबद्दल बोलायचे झाले तर या शोची काही प्रमाणात दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावर आहे, मी काही स्कीटदेखील लिहणार आहे आणि अभिनय सुद्धा करणार आहे. अर्थात प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा असणार कारण १० वर्ष शो ने संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलंय आणि आताही प्रेक्षकांची तीच अपेक्षा असणार किंबहुना काही वेगळं ही अपेक्षित असेल ते पूर्ण करायच्या प्रयत्न आम्ही करू. 

"शूटचा पहिला दिवस धमाकेदार होता"

तो पुढे म्हणाला की, "या पर्वात आम्ही एकटे नसणार तर आमच्या सोबत असणार आहेत काही उभरते हास्य कलाकार जे महाराष्ट्राच्या विविध भागातून या मंचावर आले आहेत. या शोचे अस्सल स्टार ते असणार आहेत. या पर्वात माझी भूमिका तिहेरी भूमिका असणार आहे. मी दिग्दर्शनही पाहणार, स्पर्धकांचे स्कीट ही बघणार आणि परफॉर्मही करणार आहे. पण हे सगळं मी एकटा करणार नसून माझ्यासोबत आणखी काही प्रतिभाशाली लेखक आणि  दिग्दर्शक असणार आहेत आणि आम्ही सर्व मिळून काम करणार आहोत. शूटचा पहिला दिवस धमाकेदार होता. भारत, श्रेया, कुशल, गौरवसोबत मज्जा आली. मी कुशल सोबत नाटकात काम केलंय, श्रेयाने माझ्या वेबसीरिजमध्ये काम केलंय, भारत ने माझ्या नाटकात काम केलंय, गौरव सोबत काम करण्याचा योग नव्हता आला पण ती संधी या शोमुळे मिळाली."
 

"प्रेक्षकांचे प्रेम पाहून खूप भारावून गेलोय आणि..."
"जेव्हा लोकांना कळले की मी हा शो करत आहे तेव्हा शुभेच्छांचे अनेक कॉल आले. प्रेक्षकांचे प्रेम पाहून खूप भारावून गेलोय आणि आता जबाबदारी देखील वाढलेय. आम्ही सगळे खूप मेहनत करत आहोत आणि जसे स्कीट सादर होत आहेत ते पाहून मला खात्री आहे की या पर्वातून आम्ही तोच आनंद पुन्हा देऊ", असे प्रियदर्शन म्हणाला. 'चला हवा येऊ द्या- कॉमेडीच गँगवॉर' २६ जुलै पासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल.

Web Title: Priyadarshan Jadhav is playing a triple role in 'Chala Hawa Yeu Dya', said - "I will give you that same joy again.."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.