प्रियदर्शन जाधव बनला 'बाहुबली' तर कुशल बद्रीके दिसला 'भल्लालदेव'च्या अवतारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2017 13:39 IST2017-07-24T08:09:13+5:302017-07-24T13:39:13+5:30

'बाहुबली द बिगिनिंग'च्या यशानंतर देशभरात फक्त आणि फक्त बाहुबली द कन्क्लुजन या सिनेमाची चर्चा आहे. बाहुबली द कन्क्लुजन या ...

Priyadarshan Jadhav became 'Bahubali' and 'Badrali' appeared in 'Bhallaldev' | प्रियदर्शन जाधव बनला 'बाहुबली' तर कुशल बद्रीके दिसला 'भल्लालदेव'च्या अवतारात

प्रियदर्शन जाधव बनला 'बाहुबली' तर कुशल बद्रीके दिसला 'भल्लालदेव'च्या अवतारात

'
;बाहुबली द बिगिनिंग'च्या यशानंतर देशभरात फक्त आणि फक्त बाहुबली द कन्क्लुजन या सिनेमाची चर्चा आहे. बाहुबली द कन्क्लुजन या सिनेमाचा डंका देशातच नाही तर जगभरात गाजतो आहे. बाहुबली 2 सिनेमा प्रदर्शनानंतर देशासह जगभरात बाहुबली-२ सिनेमाची चर्चा झाली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे करत असताना दुसरीकडे या सिनेमातील बाहुबली, भल्लालदेव आणि सोबतच देवसेना या पात्रांचीही रसिकांमध्येही विशेष चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. बाहुबलीचा हाच फिव्हर अनेक ठिकाणी पाहायला मिळाला. आता 'बाहुबली' सिनेमाचा हा फिव्हर इतके महिन्यानंतरही संपण्याचे नाव घेत नाही. एका कार्यक्रमासाठी प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘बाहुबली २’ चित्रपटामुळे सगळीकडे बाहुबली फिव्हर पहायला मिळत आहे.मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री सुद्धा यात मागे नाही. यंदाच्या झी टॉकीज कॅामेडी अवॉर्ड्स सोहळ्यातही याचा प्रत्यय आला.अभिनेता प्रियदर्शन जाधवने बाहुबलीचा तर कुशल बद्रीकेने भल्लालदेवचा अवतार धारण करत केलेली खडाजंगी चांगलीच रंगली.एकमेकांना नामोहरम करण्यासाठी या दोघांनी कोणत्या नवनव्या चाली रचल्या हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. यात नेमकं काय घडलं? व कोणी कोणावर मात केली? या सगळ्या गोष्टी या कार्यक्रमात पाहणे रंजक ठरणार आहे.मात्र सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूप धुमाकुळ घालत आहे.हा फोटो फेसबुकवर शेअर करताच अवघ्या काही क्षणात त्याला लाईक आणि कमेंट्स येऊ लागल्या आहेत. फॅन्सना  प्रियदर्शन जाधवचा 'बाहुबली' तर कुशल बद्रीकेचा 'भल्लालदेव'चा अवतार भलताच भावला आहे.त्यामुळे या कार्यक्रमात हा मराठमोळा बाहुबली काय कमाल करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Priyadarshan Jadhav became 'Bahubali' and 'Badrali' appeared in 'Bhallaldev'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.