रस्त्यावरच्या ट्रॅफिकमधुन सायकल चालविण्यापेक्षा, दुर कुठेतरी निवांत क्षणी निसर्गाच्या सानिध्यात सायकलींग करण्याचा आनंद काही वेगळाच ...
प्रिया उमेश एन्जॉयींग सायकल रायडिंग
/> रस्त्यावरच्या ट्रॅफिकमधुन सायकल चालविण्यापेक्षा, दुर कुठेतरी निवांत क्षणी निसर्गाच्या सानिध्यात सायकलींग करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. प्रामुख्याने ज्यांना सायकलींगचे वेड आहे अशा लोकांसाठी तर डोंगराळ, घाट-दºयांमधुन केलेली रायडिंग म्हणजे भन्नाटच. उमेश कामतचे सायकलींग प्रेम तर आपल्याला माहितच आहे. त्याने चेंबुर ते खंडाळा ही सायकल रायडिंग करुन हम भी किसीसे कम नही हेच दाखवुन दिले होते. आता तो पुन्हा सायकलींग करीत आहे ते पण त्याची बायको प्रिया बापट हिच्या सोबत. प्रिया आणि उमेश हे दोघेही सध्या आॅस्ट्रेलियामध्ये हॉलिडे एन्जॉय करीत आहेत. या दोघांनाही तिकडे सायकल चालविण्याचा मोह काही आवरता आला नाही. सिडनी मधील चकाचक रस्त्यांवरुन त्यांनी सायकल रायडिंगचा मनमुराद आनंद घेतला.