तुझेच मी गीत गात आहे: प्रिया मराठेने सोडली मालिका; 'ही' अभिनेत्री दिसणार मोनिकाच्या रुपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 17:44 IST2023-07-03T17:43:36+5:302023-07-03T17:44:15+5:30

Tujhech mi geet gaat aahe: ही अभिनेत्री Bigg boss marathi च्या घरातही झळकली होती.

priya marathe left tujhech mi geet gaat aahe serial tejaswini lonari play monika | तुझेच मी गीत गात आहे: प्रिया मराठेने सोडली मालिका; 'ही' अभिनेत्री दिसणार मोनिकाच्या रुपात

तुझेच मी गीत गात आहे: प्रिया मराठेने सोडली मालिका; 'ही' अभिनेत्री दिसणार मोनिकाच्या रुपात

सध्या छोट्या पडद्यावर 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका चांगलीच ट्रेंडिंग आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येत असल्यामुळे दिवसेंदिवस या मालिकेची रंगत वाढत आहे. अभिजीत खांडकेकर, उर्मिला कोठारे, प्रिया मराठे आणि अन्य कलाकार यांनी उत्तमरित्या त्यांच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु, या मालिकेतून मोनिका म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे हिने निरोप घेतला आहे.

स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर प्रियाचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये तिने ही मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. तसंच तिच्याऐवजी आता मोनिकाची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार हेदेखील सांगितलं आहे. गेल्या वर्षभरापासून प्रिया, मोनिका ही भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे निगेटिव्ह रोल असूनही प्रियाला कमालीची लोकप्रियता मिळाली. परंतु, प्रकृतीच्या काही कारणास्तव तिने ही मालिका अर्ध्यावर सोडली आहे.

काय म्हणाली प्रिया?

'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत मी मोनिका कामत हे पात्र साकारत होते.  या पुढे मी ती भूमिका साकारणार नाहीये. अचानक आलेल्या तब्येतीच्या अडचणीमुळे मला ही भूमिका सोडावी लागल आहे.  मोनिका कामत ही भूमिका करताना मला खूप मज्जा येत होती.  तुम्हालाही ही भूमिका खूप आवडत होती. तुम्ही तिच्यावर प्रचंड प्रेमही केलं. पण जो वेळ मी त्यांना वेळ देऊ शकत होते, तो वेळ कुठेतरी कमी पडत होता. बाकी कलाकारांच्या अॅडजस्टमेंट, प्रोडक्शन टीम, तसंच तो रोलही फार डिमांडिग होता. या सगळ्याला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते म्हणून मी मालिकेतून निरोप घेतेय", असं प्रिया म्हणाली.

प्रियाच्या जागी होणार या अभिनेत्रीची एन्ट्री

प्रियाच्या जागी आता बिग बॉस मराठीफेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही मोनिकाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे आता मोनिकाच्या रुपात तेजस्विनीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र, अनेकांनी प्रियाला मिस करणार असल्याचंही म्हटलं आहे.
 

Web Title: priya marathe left tujhech mi geet gaat aahe serial tejaswini lonari play monika