अजूनही बरसात आहे! प्रिया अन् उमेशने घेतला पावसात भिजण्याचा आनंद, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 09:10 IST2023-07-13T09:10:26+5:302023-07-13T09:10:58+5:30

या गोड कपलने पावसात भिजतानाचा एक छान व्हिडिओ पोस्ट केला आहे.

priya bapat and umesh kamat enjoyed rain shared romantic video | अजूनही बरसात आहे! प्रिया अन् उमेशने घेतला पावसात भिजण्याचा आनंद, Video व्हायरल

अजूनही बरसात आहे! प्रिया अन् उमेशने घेतला पावसात भिजण्याचा आनंद, Video व्हायरल

प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) ही मराठीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी. हँडसम हिरो म्हणून उमेश कामत तरुणींचा आवडता कलाकार, तर बडबडी आणि गोड हसणारी प्रिया बापट तर सर्वांची लाडकी आहेच. दोघंही जेव्हा सोबत फोटो, व्हिडिओ शेअर करतात तेव्हा चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होतो. असाच काहीसं आता झालं आहे. या गोड कपलने पावसात भिजतानाचा एक छान व्हिडिओ पोस्ट केला आहे.

प्रियाची बहीण श्वेता बापटचा स्वत:चा साडीचा ब्रँड आहे. 'सावेंची' असं तिच्या ब्रँडचं नाव आहे. याच ब्रँडच्या कँपेन शूटसाठी प्रिया आणि उमेश पुण्यात होते. तिथे दोघंही पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. छत्री पकडून एकमेकांवर पाणीही उडवत आहेत. प्रिया निळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे तर उमेशने मरुन रंगाचा टीशर्ट घातला आहे. त्यांचा हा क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

प्रिया कॉलेजमध्ये असतानाच उमेशच्या प्रेमात पडली होती. उमेश तिच्याहून ८ वर्षांनी मोठा आहे. सुरुवातीला प्रियाच्या घरातून त्यांच्या नात्याला विरोध होता. मात्र नंतर घरच्यांची समजूत घालत अखेर 2011 साली दोघंही लग्नबंधनात अडकले. त्यांचं 'नवा गडी अन् राज्य नवं' या नाटक, चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तसंच त्यांची '..आणि काय हवं' ही वेबसिरीज प्रचंड गाजली.

Web Title: priya bapat and umesh kamat enjoyed rain shared romantic video