प्रीतमला सेटवर बसला आश्चर्याचा धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 12:22 IST2018-09-17T11:45:54+5:302018-09-17T12:22:31+5:30
संगीतकार प्रीतम सध्या ऐन भरात असून त्याने वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. एका संगीतविषयक रिअॅलिटी कार्यक्रमाचे चित्रीकरण करीत असताना त्याला त्याच्या मुलांनी आश्चर्याचा धक्का दिला.

प्रीतमला सेटवर बसला आश्चर्याचा धक्का!
संगीतकार प्रीतम सध्या ऐन भरात असून त्याने वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. एका संगीतविषयक रिअॅलिटी कार्यक्रमाचे चित्रीकरण करीत असताना त्याला त्याच्या मुलांनी आश्चर्याचा धक्का दिला. त्याची मुले या सेटवर आली आणि त्याच्याबरोबर त्यांनी काही काळ व्यतीत केला. प्रीतमचे त्याच्या मुलांवर अतिशय प्रेम असून त्यांना सेटवर आलेले पाहून त्याला अत्यंत आनंद झाला. यावेळी त्यांनी काही स्पर्धकांबरोबर काही खेळ खेळले. त्यांनी कार्यक्रमाच्या परीक्षकांशीही संवाद साधला आणि त्यांच्याबरोबर ‘सेल्फी’ही काढल्या.
या भेटीबद्दल प्रीतमने सांगितले, “वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या चित्रीकरणांची कसरत मी सांभाळीत असल्याने मला माझ्या मुलांची भेट घेण्याइतकाही वेळ उरलेला नाही. पण त्यांना इथं आल्याचं पाहून मला इतका आनंद झाला की मी त्यांच्याकडे धावतच गेलो आणि त्यांना जवळ घेतलं. तो एक फार सुंदर क्षण होता आणि आपल्या कुटुंबियांबरोबर राहणं कोणालाही आवडतंच. या मुलांना सेटवर येण्यास परवानगी दिल्यामुळे माझा दिवस संस्मरणीय केल्याबद्दल मी निर्मात्यांचे आणि माझी भेट घेतल्याबद्दल मुलांचेही आभार मानतो.”
प्रीतम सध्या स्टार प्लसवरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’ कार्यक्रमात सुनिधी चौहान आणि बादशहा यांच्याबरोबर परीक्षक मंडलावर आहे. ‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सीमा पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअॅलिटी कार्यक्रम आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवी उंची देणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील हिंदुस्तानींचं एक संमेलनच भरलेलं असतं. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात.