​प्रिन्स नरूलाने बढो बहू या मालिकेत शंकराची भूमिका साकारण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 16:50 IST2017-02-25T11:20:15+5:302017-02-25T16:50:15+5:30

प्रिन्स नरूला रोडिज आणि स्प्लिट्स व्हिलाचा विजेता ठरला होता. या दोन रिअॅलिटी शोनंतर प्रिन्सने बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये ...

Prince refused to accept the role of Shankara in this series of Big Brother | ​प्रिन्स नरूलाने बढो बहू या मालिकेत शंकराची भूमिका साकारण्यास दिला नकार

​प्रिन्स नरूलाने बढो बहू या मालिकेत शंकराची भूमिका साकारण्यास दिला नकार

रिन्स नरूला रोडिज आणि स्प्लिट्स व्हिलाचा विजेता ठरला होता. या दोन रिअॅलिटी शोनंतर प्रिन्सने बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासूनच तो या कार्यक्रमाचा विजेता ठरेल अशी सर्वत्र चर्चा होती. त्याने बिग बॉसचे विजेतेपद मिळवल्यानंतर तो आता मालिकांकडे वळला आहे. सध्या बढो बहू या मालिकेत तो एका पहलवानाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वी त्याला सांगण्यात आलेली भूमिका करण्यास त्याने स्पष्ट नकार दिला.
प्रिन्सने या मालिकेच्या एका भागात शंकराची भूमिका साकारावी असे निर्मात्यांचे म्हणणे होते. एका दृश्यात प्रिन्स मालिकेत साकारत असलेल्या लकीची पत्नी बढो आपल्या पतीच्या रूपात शंकराची कल्पना करते असे त्यांना दाखवायचे होते. त्यासाठी प्रिन्सला शंकराचे रूप घ्यावे लागणार होते. त्या भागाचे चित्रीकरण निर्मात्यांना लगेचच करायचे होते. पण सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रिन्सने चिकन खाल्ले असल्याने त्याने ही भूमिका साकारण्यास मनाई केली. 
या मालिकेत प्रिन्स एका पहलवानाची भूमिका साकारत असल्याने त्याला डाएटमध्ये अंडी आणि चिकन खावे लागते. प्रिन्सला सेटवर आल्यावर काही वेळानंतर शंकराच्या भूमिकेबद्दल सांगण्यात आले. पण तोपर्यंत प्रिन्सने चिकन खाल्ले असल्याने ही भूमिका साकारण्यास त्याने नकार दिला. कधीही कोणत्याही देवाची भूमिका साकारायची असल्यास त्या दिवसभरात प्रिन्स कधीच मांसाहार करत नाही. याविषयी प्रिन्स सांगतो, "मी देवाची भूमिका साकारण्याआधी कधीच मांसाहार करत नाही ही माझी अनेक वर्षांपासूनची सवय आहे. मला सेटवर आल्यावर मला शंकराची भूमिका साकारायची आहे असे सांगण्यात आले. त्यावेळी लगेचच मी निर्मात्यांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी माझ्या भावनांचा आदर राखून हे दृश्य न करण्याचे ठरवले यासाठी मी त्यांचा आभारी आहे."

Web Title: Prince refused to accept the role of Shankara in this series of Big Brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.