स्वप्नपूर्तीसाठी संघर्षमय प्रवासाची तयारी ठेवा- शशांक केतकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 17:15 IST2016-12-04T18:09:14+5:302017-01-05T17:15:51+5:30
-Ravindra More शशांक केतकर : पालकांनी आपल्या पाल्यांना प्रोत्साहन द्यावे; मुंबई, पुणे हेच विश्व नाही.... जीवन खूप सुंदर आहे. ...
.jpg)
स्वप्नपूर्तीसाठी संघर्षमय प्रवासाची तयारी ठेवा- शशांक केतकर
शशांक केतकर : पालकांनी आपल्या पाल्यांना प्रोत्साहन द्यावे; मुंबई, पुणे हेच विश्व नाही....
जीवन खूप सुंदर आहे. ते जगत असताना आपल्या स्वप्नांना महत्त्व द्यावे. स्वप्नपूर्तीसाठी अनेक अडचणी येतीलच मात्र त्यावर मात करा, यश हमखास मिळेल, असे आवाहन सिनेअभिनेता व ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील अभिनेता शशांक केतकर याने केले.
मू.जे.महाविद्यालयात आयोजित खान्देश गॉट टॅलेंट या स्पर्धेसाठी तो जळगावात आला होता. शशांक म्हणाला, आॅस्ट्रेलियामध्ये शिकायला होतो़ बी़ई.चे शिक्षण पूर्ण करून भारतात परतलो़ माझे स्वप्नपूर्ण करण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ मागवून घेतला़ यानंतर हळूहळू लोक मला भेटत गेले़ आॅडिशन देत गेलो यातून होणार सून मी या घरची या मालिकेसाठी निवड झाली़ जेव्हा तुम्ही मनापासून काम करतात तेव्हा आपोआपच तुम्हाला चांगली माणस भेटत जातात, तुमचा प्रवास सोपा होतो, असे शशांक केतकर म्हणाला़.
अन् घरा-घरापर्यंत पोहचलो
कालाय तस्मये नम: ही माझी पहिली मालिका़ यातील कामगिरीमुळे मला होणारी मी सून या घरची मालिकेतील श्री पात्राची प्रमुख मिळाली़ मोठे स्टारकॉस्ट होते़ मी सगळ्यांसाठी ज्युनियर होतो़ मनोज कोल्हटकर असतील, मनोज जोशी असतील, मंदार देवस्थळी असतील ज्यांनी ही निर्मिती केली यांच्यासोबत काम करायला मिळाल़े होणार सून या मालिकेने मला घराघरात, प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहचविले़ न भुतो न भविष्यती एवढे रेकॉर्ड या मालिकेने केले, असेही शशांक म्हणाला़
वन वे तिकीट मध्ये झळकलो
नाटक, मालिका या माध्यमातून मिळालेल्या यशामुळे मला आपआपचं संधी उपलब्ध होत गेल्या़ वन वे तिकीट हा मराठी भाषेतील पहिला असा मराठी चित्रपट आहे़ ज्याची इटली, फ्रान्स व स्पेन या तीन देशांमध्ये शुटींग झाली़. त्यात होणार सून मधील रोहीणी हंटगंडी यांच्यासोबत काम करण्याचा खूपच फायदा झाला.
ग्लॅमरच्या मागे मोठा संघर्ष
गावानुसार प्रत्येकाची संस्कृती बदलते़ आई-वडीलांना मुलांनाही जे करायचे आहे करू द्या, मुले धडपडताहेत, त्यांना धडपडू त्या आजच्या पीढीमध्ये स्ट्रगल करण्याची खूप मोठी ताकद आहे़ सिनेक्षेत्र आव्हानात्मक क्षेत्र आहे़ त्यासाठी तेवढे कष्ट करायची असली तर या क्षेत्रातही मोठे करीअर करता येते, असा संदेशही शशांकने या क्षेत्रात येवू इच्छिणाऱ्या तरूण पिढीला दिला़.
प्रत्येक गोष्टी वेगाने बदलताहेत़ चांगले कलाकार येतात़ दिवस पालटलेले आहेत़ मात्र कलाकार म्हणून मला एक मोठी खंत आहे की, अद्यापही आपल्याकडे थियटरची कॉलीटीत इंटेरिअर असो वॉश बेसिंग सुधारणे गरजेचे आहे़ मात्र या सगळ्या गोष्टी बदलतील, भारताला मोदींच्या रूपात चांगले लीडर मिळाले आहेत. जेव्हा चांगला लिडर मिळतो, तेव्हा सगळ्या गोष्टी सकारात्मक पध्दतीने होतात़.