"एक पर्व संपलं..."; 'प्रेमाची गोष्ट' फेम अपूर्वा नेमळेकरची भावुक पोस्ट, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 12:02 IST2025-07-01T11:57:19+5:302025-07-01T12:02:04+5:30

"शूटिंगचा शेवटचा दिवस...", 'प्रेमाची गोष्ट' मधील सावनीने शेअर केला सेटवरील 'तो' फोटो, भावुक होत म्हणाली...

premachi goshta serial off air soon actress apurva nemlekar shared emotional post  | "एक पर्व संपलं..."; 'प्रेमाची गोष्ट' फेम अपूर्वा नेमळेकरची भावुक पोस्ट, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली...

"एक पर्व संपलं..."; 'प्रेमाची गोष्ट' फेम अपूर्वा नेमळेकरची भावुक पोस्ट, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली...

Apurva Nemlekar: छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या धाटणीच्या विषयांवर आधारित नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे वर्षानुवर्ष सुरु असलेल्या जुन्या मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेतात. अशीच एक लोकप्रिय मालिका जी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतंच या मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं आहे. ही मालिका म्हणजे प्रेमाची गोष्ट. जवळपास दोन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर ही लोकप्रिय मालिका ऑफ एअर होणार आहे. 

प्रेमाची गोष्ट या मालिकेचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. मालिकेतील सागर-मुक्ता तसेच सावनी, इंद्रा कोळी, स्वाती, लकी आणि आदित्य-सई या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. अशातच मालिकेत सावनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकरनेसोशल मीडियावर सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. "प्रेमाची गोष्ट मालिकेचा शेवटचा दिवस... मिस यू ऑल..., एक पर्व संपलं,"असं  कॅप्शन लिहित अभिनेत्रीने सेटवरील फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. दरम्यान, आता ही मालिका बंद होणार असल्याचं कळताच प्रेक्षक देखील भावुक झाले आहेत.

प्रेमाची गोष्ट मालिकेबद्दल सांगायचं झालं यामध्ये अभिनेता राज हंचनाळे, स्वरदा ठिगळे तसेच अपूर्वा नेमळेकर, शुभांगी गोखले यांसारखे कलाकार महत्वाच्या भूमिकेत होते. 

Web Title: premachi goshta serial off air soon actress apurva nemlekar shared emotional post 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.