"माझ्या वाट्याला जे काही आलं...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाला- "या प्रवासात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 13:34 IST2025-07-06T13:32:12+5:302025-07-06T13:34:43+5:30
'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाला- "या प्रवासात माझ्याबरोबर..."

"माझ्या वाट्याला जे काही आलं...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाला- "या प्रवासात..."
Raj Hanchanale Post: छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा कमालीचा वाढला आहे. या मालिका आणि प्रेक्षकांमध्ये एक अतुट नातं निर्माण झालेलं असतं. त्या मालिकांमधील कलाकार प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागतात. अशीच एक मालिका म्हणजे प्रेमाची गोष्ट. स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिका ४ सप्टेंबर २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जवळपास दीड वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर ही मालिका आता ऑफ एअर होणार आहे. त्यामुळे चाहत्यांसह मालिकेतील प्रत्येक कलाकार भावुक झाला आहे. अशातच प्रेमाची गोष्ट मध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता राज हंचनाळेने (Raj Hanchanale) सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेमध्ये राज हंचनाळे हा सागर कोळी नावाची व्यक्तिरेखा साकारत होता. त्याने ही भूमिका उत्तमरित्या वठवली. त्यात आता मालिका बंद होणार असल्याने अभिनेता भावुक झाला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत त्याने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये अभिनेत्याने लिहिलंय की, "माझ्या वाट्याला जे काही आलं ते प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न केला. या प्रवासात सोबत असलेल्या सर्व कलाकार ,लेखक , डायरेक्टर , तंत्रद्य आणि ही संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाह आणि सुमीत प्रोडक्शन सगळ्यांचे आभार. पुढच्या प्रोजेक्ट्मध्ये पुन्हा तुमचं मनोरंजन करण्याची आणि मन जिंकण्याची संधी मिळो! तुम्हा सर्वांनी जे प्रेम दिलत त्यासाठी खूप खूप आभार. मनापासून. सागर कोळी." अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.
दरम्यान, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेबद्दल सांगायचं झालं यामध्ये अभिनेता राज हंचनाळे, स्वरदा ठिगळे तसेच अपूर्वा नेमळेकर, शुभांगी गोखले यांसारखे कलाकार महत्वाच्या भूमिकेत होते.