नणंदेच्या बर्थडे पार्टीत बेबी बंप लपवताना दिसली गौहर खान, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 13:42 IST2022-12-30T13:37:07+5:302022-12-30T13:42:32+5:30
Gauahar Khan Photos:'बिग बॉस' फेम गौहर खानचे नणंदेच्या बर्थडे पार्टीतले फोटो समोर आलं आहेत. फोटोंमध्ये गौहर तिचा बेबी बंप लपवताना दिसतेय.

नणंदेच्या बर्थडे पार्टीत बेबी बंप लपवताना दिसली गौहर खान, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो
Gauahar Khan At Nanad Anam Darbar Birthday Party:अभिनेत्री गौहर खान सध्या तिची प्रेग्रेंन्सी एन्जॉय करतेय. अभिनेत्रीनं दुसऱ्या मॅरेज अनिव्हर्सरीच्या निमित्ताने चाहत्यांनासोबत ही गुडन्यूज शेअर केली. यानंतर चाहत्यांनी गौहरवर अभिनंदनचा वर्षाव केला. अलिकडेच अभिनेत्री नणंदच्या बर्थ डे पार्टीत पोहोचली होती. या दरम्यान गौहर खान आपला बेबी बम्प लपवताना दिसली. मात्र अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंन्सीचा ग्लो स्पष्ट दिसत होत.
नुकताच जैद दरबार(Zaid Darbar) ची बहीण अनम दरबारचा वाढदिवसाची पार्टी झाली. अनाम दरबार ही देखील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. गौहर खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या नणंदेच्या बर्थडे पार्टीचे दोन फोटो शेअर केले आहेत. गौहर खानच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंन्सीचा आलेला ग्लो फोटो स्पष्ट दिसतोय. अभिनेत्रीने ड्रेसच्या ओढणीनं बेबी बम्प लपवण्याचा प्रयत्न केला आहे.
गौहर आणि जैदची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. लॉकडाऊन दरम्यान घरातील ग्रॉसरी खरेदी करताना दोघे एका दुकानात भेटले होते. गौहरने जैदला स्टोअरमध्ये पाहिले नाही. यानंतर जैदने गौहरला इन्स्टाग्रामवर मेसेज केला आणि दोघेही बोलू लागले. हळूहळू मैत्री झाली आणि तिचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्न केले.आता लग्नाच्या दोन वर्षानंतर दोघेही लवकरच आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.
गौहर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. याशिवाय ती ओटीटीवरील अनेक शोमध्येही दिसली आहे. 'इशकजादे'मधील गौहरची 'छोकरा जवान रे' आणि 'झल्ला-वल्ला' ही गाणी सुपरहिट ठरली होती. अलीकडेच ती नेहा कक्करच्या 'बारिश में तुम' या गाण्यात पती जैदसोबत दिसली होती.