'स्वामी समर्थांच्या मठात प्रार्थना केली आणि...', जितेंद्र जोशीच्या 'त्या' किस्स्यावर श्रेयस तळपदेला कोसळलं रडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 09:39 IST2023-06-09T09:39:14+5:302023-06-09T09:39:58+5:30
Shreyas Talpade : खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात श्रेयस तळपदेने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्याचा जवळचा मित्र अभिनेता जितेंद्र जोशीला व्हिडीओ कॉल लावण्यात आला आणि जितेंद्र श्रेयसच्या सिने प्रवासाबद्दल सांगताना दिसणार आहे.

'स्वामी समर्थांच्या मठात प्रार्थना केली आणि...', जितेंद्र जोशीच्या 'त्या' किस्स्यावर श्रेयस तळपदेला कोसळलं रडू
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याने विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. शेवटचा तो माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत पाहायला मिळाला. ही मालिका संपली असली तरी त्याने साकारलेला यश आजही रसिकांच्या मनात घर केले आहे. दरम्यान आता त्याने झी मराठी वाहिनीवरील खुपते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाचा हा तिसरा सीझन आहे. या कार्यक्रमाचे प्रोमो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात श्रेयस तळपदेने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्याचा जवळचा मित्र अभिनेता जितेंद्र जोशीला व्हिडीओ कॉल लावण्यात आला आणि जितेंद्रनं श्रेयसच्या सिने प्रवासाबद्दल सांगताना दिसणार आहे. जितेंद्र म्हणाला की, श्रेयस बऱ्याच गोष्टी आहेत. मनामध्ये अनेक भावना आहे. माझ्याकडे काम नव्हते त्यावेळी आपला मित्र सतीश राजवाडेकडे मला कामासाठी घेऊन जाणारा तूच होतास. मला एक किस्सा अजूनही ठळकपणे आठवतो.
श्रेयस तळपदेला अश्रू अनावर...
जितेंद्र पुढे म्हणाला की, तुझ्या आईनं तुला सांगितलं होतं की, आता कुठेतरी नोकरी बघ. नाटकातून काही मिळत नाही. त्यावेळी आपण दोघे स्वामी समर्थांच्या मठात गेलो होतो आणि तिथे दोघांनी मिळून प्रार्थना केली होती. ज्यानंतर जे झाले ते संपूर्ण महाराष्ट्रानेच नाही तर देशाने पाहिले. तुला खूप खूप शुभेच्छा. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतोस. जितेंद्र जोशीचे हे बोलणं ऐकून श्रेयस तळपदेला अश्रू अनावर झाले.