प्रथमेश आणि भाग्यश्रीची जिवलगा दोस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 13:08 IST2016-04-23T07:38:55+5:302016-04-23T13:08:55+5:30

 मित्र म्हणजे आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची अशी गोष्ट असते. मित्र सोबत असेल तर सबकुछ आणि सोबत नसेल तर कुछ ...

Prathamesh and Bhagyashree's friendship | प्रथमेश आणि भाग्यश्रीची जिवलगा दोस्ती

प्रथमेश आणि भाग्यश्रीची जिवलगा दोस्ती

 
ित्र म्हणजे आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची अशी गोष्ट असते. मित्र सोबत असेल तर सबकुछ आणि सोबत नसेल तर कुछ भी नही असेच हे धोरण असते. विषेशत: जेव्हा तुम्ही कॉलेजला प्रवेश घेता तेव्हा खरं हे मैत्रीचं प्रेमळ भूत आपल्या मानेवर बसतं आणि मग मित्र म्हणेल ती पूर्व दिशा म्हणत आपणही त्याच्या प्रत्येक बाबतीत न सांगता, न बोलावता सामिल होत असतो. अशाच खºयाखºया मित्रमैत्रिणींची जोडी पडद्यावर आपल्या भेटीला येतेय ती दिग्दर्शक सतीश मोतलिंग यांच्या आगामी 35% काठावर पास या चित्रपटाच्या माध्यमातून, हे मित्रमैत्रिण दुसरे तिसरे कोणी नसून महाराष्ट्राचा लाडका दगडू आणि चिऊ ; म्हणजेच प्रथमेश परब आणि भाग्यश्री संकपाळ होय. बी.पी. अर्थात बालक पालक या चित्रपटातून पदार्पण केलेले प्रथमेश आणि भाग्यश्री या दोहोंची गट्टी या चित्रपटाच्या निमित्ताने जी जमली ती आजतागायत तशीच टिकून आहे. विशेष म्हणजे खºया आयुष्यात अत्यंत चांगले मैत्री असणारे हे दोघे पडद्यावरही मित्राच्याच भूमिकेत पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहेत..! 35% काठावर पास या चित्रपटात प्रथमेशच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका भाग्यश्री साकारते आहे. पडद्यामागेही या दोघांची दंगामस्ती तशीच सुरू असते जशी आपण पडद्यावर पाहतो त्यामुळे बालक पालक सारखीच किंबहुना त्याहुनही अधिक धमाल प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे असे खात्रीने म्हणता येईल..!

Web Title: Prathamesh and Bhagyashree's friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.