या कारणामुळे हरकून गेले प्रशांत दामले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 15:13 IST2018-01-16T09:43:15+5:302018-01-16T15:13:15+5:30
'गेला माधव कुणीकडे' या नाटकाचे विश्वविक्रमी दहा हजाराहून अधिक प्रयोग करुन गिनीज बुकात नोंद करणारे अभिनेता प्रशात दामले.प्रसन्न, हसरं ...
.jpg)
या कारणामुळे हरकून गेले प्रशांत दामले!
' ;गेला माधव कुणीकडे' या नाटकाचे विश्वविक्रमी दहा हजाराहून अधिक प्रयोग करुन गिनीज बुकात नोंद करणारे अभिनेता प्रशात दामले.प्रसन्न, हसरं व्यक्तीमत्त्व, कुशल अभिनय, उत्कृष्ट संवादफेक, कॉमेडीचं अचूक टायमिंग आणि नेमकी देहबोली यामुळे प्रशांत दामले यांनी महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील मराठी नाट्यरसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.रंगभूमीवर त्यांनी आजवर विविध विक्रम आपल्या नावावर केले आहेत.त्यामुळेच त्यांना रंगभूमीचा विक्रमादित्य असंही म्हटलं जाते.आजही न थकता तितक्याच जोमानं रसिकांचं दिलखुलास मनोरंजन करण्याचं काम प्रशांत दामले आपल्या नाटकातून करत असतात.महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांच्या विविध नाटकांचे प्रयोग सुरु असतात.नेहमीच प्रशांत दामले यांच्या नाटकांची दमदार एक्स्प्रेस सातासमुद्रापारही रसिकांचे मनोरंजन करत असते.आजवर आपल्या विविध नाटकांचे प्रयोग प्रशांत दामले यांनी परदेशात सादर केले आहेत.नाटकाच्या अभिनयाची जादू परदेशातील नाट्यरसिकांना अनुभवत असतात.छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेल्या 'तुमच्यासाठी काय पन' कार्यक्रमावरील गाजावाजा जंक्शनवर नुकतेच प्रशांत दामले येऊन गेले.सध्या ते 'संशय कल्लोळ' आणि 'साखर खाल्लेला माणूस' तसेच 'आज काय स्पेशल' या कार्यक्रमामध्ये खूप बिझी आहेत.तरी देखील ते वेळात वेळ काढून त्यांनी 'गाजावाजा जंक्शनवर' हजेरी लावली.ज्यामध्ये त्यांनी अनेक किस्से,आठवणी सांगितल्या.मराठी नाट्यसृष्टीतले विक्रमादित्य अशी त्यांची ओळख असून त्यांनी प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे.त्यांचे हजारो,लाखो चाहते आहेत,जे त्यांना आपला गुरु,प्रेरणास्थानी मानतात.असाच एक 'तुमच्यासाठी काय पन'च्या मंचावर देखील आहे.ऋषिकेश विचारे हा कार्यक्रमामधील आर्ट डिरेक्शनच्या टीममध्ये असून तो प्रशांत दामले यांचा खूप मोठा चाहता आहे.त्याने प्रशांत दामले यांच्यासाठी अनोखी भेट तयार केली ती म्हणजे त्यांचा स्केच.हा अप्रतिम स्केच त्याने स्वत: काढला आणि त्यांना दिला.ज्याबद्दलचा आनंद त्याने सोशल मिडीयावर देखील व्यक्त केला.हा स्केच बनविण्यासाठी त्याला तब्बल ७२ तास लागले.हे स्केच बघून ऋषिकेशचे त्यांनी तोंडभरून कौतुकही केले आहे.