प्रार्थना बेहरेच्या बोल्ड फोटोशूटच्या व्हिडीओनं वाढवलं इंटरनेटचं तापमान, एकदा पाहाच हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 16:27 IST2022-02-08T16:26:49+5:302022-02-08T16:27:24+5:30
प्रार्थना बेहरे (Prarthana Behere)च्या बोल्ड फोटोशूटच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

प्रार्थना बेहरेच्या बोल्ड फोटोशूटच्या व्हिडीओनं वाढवलं इंटरनेटचं तापमान, एकदा पाहाच हा व्हिडीओ
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) मधील नेहा कामत घराघरात पोहचली आहे. या मालिकेत नेहा कामत ही सामान्य घरातील मुलगी दाखवली असल्याने तिचा पेहराव आणि राहणीमान देखील साधे दाखवण्यात आले आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप भावतो आहे. नेहाची भूमिका अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) हिने साकारली आहे. तिच्या सिंपल लूकच्या प्रेमात प्रेक्षक आहेत. मात्र नुकतंच प्रार्थनाने या कॅरेक्टरच्या अगदी विरुद्ध बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे. या फोटोशूट दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
न्यू मी कमिंग सून म्हणत प्रार्थनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची एक छोटीशी झलक दाखवणारा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रार्थना बेहरे बोल्ड लूकमध्ये दिसते आहे. वेगवेगळ्या वेस्टर्न आउटफिटमधल्या लूकमध्ये प्रार्थना हॉट दिसते आहे.
या व्हिडिओमध्ये प्रार्थनाने फोटोशूट दरम्यानचे बिहाईंड द सीन्स देखील दाखवले आहेत. त्यात अभिनेत्री आणि स्टायलिस्ट शाल्मली टोळ्ये दिसते आहे. प्रार्थनाच्या या फोटोशूटसाठी शाल्मली टोळ्येने स्टायलिंगची जबाबदारी पार पाडली आहे. काही दिवसांपूर्वी देखील प्रार्थनाने या फोटोशूटमधला एक हॉट लूक पोस्ट करत न्यू मी कमिंग सून असे म्हटले होते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिचे चाहते बोल्ड फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.