Prarthana Behere : मध्यरात्री 2 वाजता प्रार्थना बेहरेचं चाललंय तरी काय? नवऱ्यासोबतचा रोमॅन्टिक व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 18:05 IST2022-09-30T18:02:38+5:302022-09-30T18:05:40+5:30
Prarthana Behere : होय, प्रार्थनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत प्रार्थना आणि तिचा नवरा अभिषेक दोघंही दिसत आहे. सर्वात खास आहे ती या व्हिडीओची वेळ...

Prarthana Behere : मध्यरात्री 2 वाजता प्रार्थना बेहरेचं चाललंय तरी काय? नवऱ्यासोबतचा रोमॅन्टिक व्हिडीओ व्हायरल
‘माझी तुझी रेशीम गाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath) या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली मराठमोळी प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) ही सर्वांची आवडती अभिनेत्री. सोशल मीडियावरचे तिचे फोटो, व्हिडीओ, रिल्स क्षणात व्हायरल होतात, ते त्यामुळेच. सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असलेल्या मराठी सेलिब्रिटींच्या यादीत प्रार्थनाचं नावही आहेच. सध्या तिचीच चर्चा आहे. होय, प्रार्थनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
या व्हिडीओत प्रार्थना आणि तिचा नवरा अभिषेक दोघंही दिसत आहे. सर्वात खास आहे ती या व्हिडीओची वेळ. होय, मध्यरात्रीनंतर 2 वाजता प्रार्थना व अभिषेक एकमेकांच्या पापात भागीदार बनले आहेत. होय, ‘माय पार्टनर इन क्राईम’ असं कॅप्शन देत प्रार्थनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये प्रार्थना आणि तिचा नवरा अभिषेक दोघंही रात्री 2 वाजता आईस्क्रीम खाताना दिसतेय.अभिषेकच्या हातात आईस्क्रिमचा डबा आहे आणि तो प्रार्थनाला आईस्क्रीम भरवत आहे. किती वाजलेत रे? असं प्रार्थना अभिषेकला विचारते. यावर रात्रीचे 2 असं उत्तर तो देतो.
या व्हिडीओला चाहते भरभरून पसंती देत आहे. व्हॉट अ स्वीट क्राईम, अशी कमेंट एकाने केली आहे. रात्री दोन वाजता व्हॅनिला आईस्क्रीम, बटर स्कॉच, ब्लॅक करंट वगैरे असायला हवं होतं, अशी मजेशीर कमेंट एका चाहत्याने केली आहे.
प्रार्थना बेहरेने अभिषेक जावकरसोबत 14 नोव्हेंबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केलं आहे. मूळ ‘सिंघम’ चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी त्याने रेड बल्ब स्टुडिओज नावाची स्वत:ची निर्मितीसंस्था सुरु केली. डब्बा ऐस पैस, शुगर, सॉल्ट आणि प्रेम या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केली आहे. मिसिंग ऑन अ वीकेंड या हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं.