प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 09:38 IST2025-11-06T09:38:21+5:302025-11-06T09:38:48+5:30
'किंग प्रणित' म्हणत चाहत्यांचा पाठिंबा, घरात वापसी करणार?

प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
गेल्या आठवड्यात'बिग बॉस १९' मधून मराठमोळा प्रणित मोरे बाहेर पडला. प्रणितला सीक्रेट रुममध्ये पाठवलं गेलंय अशीही चर्चा झाली होती. मात्र तब्येतीच्या कारणामुळे त्याला शो सोडावा लागला. प्रणितच्या शो मधून बाहेर जाण्याने घरातील सदस्य निराश झाले. विशेषत: मालती चहर आणि गौरव खन्ना यांना प्रणितची खूप जास्त आठवण येत आहे. दरम्यान प्रणित आज घरात पुन्हा एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे.
प्रणित मोरे गेल्या आठवड्यात नॉमिनेट झाला होता. कमी मतं मिळाले नसतानाही त्याला घराबाहेर जावं लागलं होतं. त्यामुळे आता चाहत्यांना अशी आशा आहे की प्रणित पुन्हा घरात प्रवेश करेल. आज तो कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे. उद्या हा एपिसोड पाहायला मिळेल. प्रणित जर पुन्हा घरात आला तर गौरव आणि मालती नक्कीच खूश होणार आहेत.
प्रणितसाठी सोशल मीडियावर कॅम्पेनच सुरु आहे. तो घरात किती चांगला वागला याची उदाहरणं प्रेक्षक देत आहेत. तसंच तब्येत बरी झाली असेल तर तो कमबॅकसाठी पात्र असल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत. 'अख्खा देश वाट पाहत आहे. भावना पीक वर आहेत, डोळे पाणावले आहेत, हृदय धडधडत आहे आणि आनंद गगनात मावेना झाला आहे..कारण प्रणित पुन्हा येत आहे.' ,'प्रणितने नेहमीच मर्यादा न ओलांडता खेळला आहे..किंग प्रणित परत येतोय' अशा पोस्ट सोशल मीडियावर दिसत आहेत.
Whole India is waiting for this moment ⭐ ✨
— Pranit More OFC (@PranitMoreFC) November 5, 2025
Emotions are high, eyes are Wet, Heart is bumping, Excitement is on cloud with this news of 👇
KING PRANIT IS COMING #PranitMore || #PranitKiPaltanpic.twitter.com/SyUVo8DYh6
प्रणित मोरे या सीझनचा सर्वात स्ट्राँग स्पर्धक होता. प्रणितने आपल्या साधेपणाने, कॉमेडीने आणि वेगळेपणाने सर्वांचंच मन जिंकलं. तर दुसरीकडे प्रणितला अचानक बाहेर काढल्याने सोशल मीडियावर नाराजीही व्यक्त केली गेली. इस बार का सीझन मजाक बनकर रह गया है' अशा प्रतिक्रिया आल्या.