प्रणित मोरेला लागली लॉटरी, सलमानच्या 'किक २'मध्ये लागली वर्णी? 'बिग बॉस'च्या फिनालेमध्ये सिनेमाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 12:21 IST2025-12-08T12:20:33+5:302025-12-08T12:21:15+5:30
'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) अंतिम सोहळा पार पडला. ७ डिसेंबरला शोचा ग्रँड फिनाले होता. या दरम्यान, सलमान खानने (Salman Khan) 'किक २' (Kick 2) ची घोषणा केली. सोबतच त्याने प्रणीत मोरेबद्दलही प्रतिक्रिया दिली.

प्रणित मोरेला लागली लॉटरी, सलमानच्या 'किक २'मध्ये लागली वर्णी? 'बिग बॉस'च्या फिनालेमध्ये सिनेमाची घोषणा
'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) अंतिम सोहळा पार पडला. ७ डिसेंबरला शोचा ग्रँड फिनाले होता. या दरम्यान, सलमान खानने (Salman Khan) 'किक २' (Kick 2) ची घोषणा केली. सोबतच त्याने प्रणीत मोरेबद्दलही प्रतिक्रिया दिली. 'बिग बॉस १९'चा अंतिम सोहळा दमदार होता. गौरव खन्ना या शोचा विजेता ठरला. शोच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने 'किक २'ची घोषणा केली. त्याने हे देखील सांगितले की, तो या चित्रपटासाठी प्रणित मोरेचे नाव शिफारस करणार आहे.
'बिग बॉस १९' शोमध्ये प्रणीत मोरेचे एलिमिनेशन होण्यापूर्वी त्याला त्याच्या 'बॅगेज'बद्दल विचारले गेले. तेव्हा प्रणीत मोरे म्हणाला, 'माझे एक बॅगेज होते की मी खूप साऱ्या बॉलिवूड कलाकारांवर विनोद करत असे. तर ते बॅगेज मी इथेच सोडून जात आहे.' त्यावर सलमान खान म्हणाला, ''थांबा, ते बॅगेज आम्ही खाली करू. आम्ही करू. ती तुमची जबाबदारी नाही. ती आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे भावा. आता मी 'किक २' करत आहे. तर तुझे नाव मी १०० टक्के शिफारस करणार आहे.''
माहितीनुसार, 'किक' २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खान देवी लाल सिंगच्या भूमिकेत होता. चित्रपटाला खूप पसंती मिळाली होती. तेव्हापासून चाहते या चित्रपटाच्या सीक्वलची वाट पाहत आहेत. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी नादियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर 'सिकंदर'च्या सेटवरील सलमान खानचा एक फोटो शेअर केला होता. यात त्याने 'किक २'ची घोषणा केली होती.
'किक'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
आता एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर सलमान खानने देखील 'किक २'ला दुजोरा दिला आहे. 'किक' हा २००९ मध्ये आलेल्या रवी तेजाच्या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. 'किक'मध्ये सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस, रणदीप हुडा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाला खूप पसंती मिळाली होती. १४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ४०२ कोटींची कमाई केली होती.
वर्कफ्रंट
सलमानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, 'किक २' व्यतिरिक्त त्याच्याकडे 'द बॅटल ऑफ गलवान' हा चित्रपट देखील आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. सेटवरून एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये चित्रांगदा सिंग दिसली होती.