एका वर्षात घेतली दुसरी आलिशान कार! 'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्रीची मोठी झेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:36 IST2026-03-06T11:35:49+5:302026-03-06T11:36:48+5:30

अभिनेत्रीनं वर्षभरातच आपली दुसरी आलिशान कार खरेदी केली आहे.

Prajakta Navnale Buys New Tata Curvv Ev Car Second Luxury Car In One Year Video | एका वर्षात घेतली दुसरी आलिशान कार! 'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्रीची मोठी झेप

एका वर्षात घेतली दुसरी आलिशान कार! 'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्रीची मोठी झेप

मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार सध्या यशाची नवनवीन शिखरे सर करत आहेत. कोणी नवीन घर घेत आहे, तर कोणी आलिशान गाडी. अशातच 'येड लागलं प्रेमाचं' फेम लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे हिने आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. प्राजक्ताने वर्षभरातच आपली दुसरी आलिशान कार खरेदी केली आहे.  या आनंदाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्राजक्ताने टाटा कंपनीची अत्याधुनिक Curvv EV ही इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, गेल्याच वर्षी जुलै महिन्यात तिने 'Harrier' ही कार घेतली होती. अवघ्या एका वर्षात दुसरी महागडी गाडी घेतल्यामुळे प्राजक्ताच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. Financial Express नुसार, या नवीन कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे २२.२४ लाख रुपये आहे.

व्हिडीओ शेअर करताना प्राजक्ताने लिहिले, "गणपती बाप्पा मोरया. Harrier नंतर आता Curvv EV ही कारदेखील घेतली आहे. आणखी एक नवीन कार!". यावेळी प्राजक्ता आपल्या कुटुंबासह गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी शोरूममध्ये पोहोचली होती.


कलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
प्राजक्तावर चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री अक्षया हिंदळकर-निकम हिच्यासह अनेक सहकलाकार आणि चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. "अभिनंदन प्राजू", "तुला खूप खूप शुभेच्छा" अशा शब्दांत तिचे कौतुक केले जात आहे.

प्राजक्ताचा अभिनय प्रवास
प्राजक्ता नवनाळे सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती मंजिरीची बहीण 'ऋतुजा'च्या भूमिकेत दिसत आहे. याआधी तिने 'जीव माझा गुंतला' आणि 'मुलगी झाली हो' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अभिनयासोबतच प्राजक्ता फिटनेस फ्रीक असून जिममधील तिचे वर्कआउट व्हिडीओ देखील चर्चेत असतात.

Web Title : अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे ने एक साल में दूसरी लग्जरी कार खरीदी।

Web Summary : 'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे ने एक साल में अपनी दूसरी लग्जरी कार, टाटा कर्व्ह ईवी खरीदी, इससे पहले हैरियर खरीदी थी। उनकी सफलता का जश्न मनाया जा रहा है, नई कार की कीमत लगभग ₹22.24 लाख है। सहकर्मियों और प्रशंसकों ने उन्हें बधाई दी है।

Web Title : Actress Prajakta Navnale buys second luxury car within a year.

Web Summary : Actress Prajakta Navnale, known for 'Yed Lagla Premacha', bought her second luxury car in a year, a Tata Curvv EV, following her previous Harrier purchase. Her success is widely celebrated, with the new car costing approximately ₹22.24 lakh. Colleagues and fans have congratulated her.