यंदाचे वर्षी फकस्त मनातल्या मनात म्हणत, प्राजक्ता माळीने शेअर केलेलं फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 15:45 IST2021-03-29T15:14:57+5:302021-03-29T15:45:04+5:30

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे कलरफुल साडीतले फोटो शेअर केले आहेत.

Prajakta mali shares her throwback photoshoot | यंदाचे वर्षी फकस्त मनातल्या मनात म्हणत, प्राजक्ता माळीने शेअर केलेलं फोटोशूट चर्चेत

यंदाचे वर्षी फकस्त मनातल्या मनात म्हणत, प्राजक्ता माळीने शेअर केलेलं फोटोशूट चर्चेत

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले  आहे. होळीच्या सणावरदेखील निर्बंध लावण्यात आले होते.  बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत दरवर्षी होळी मोठ्या धुमधड्याक्यात साजरी केली जाते मात्र यावर्षी सगळ्यांची होळी पार्टी कॅन्सल करण्यात आली. अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे कलरफुल साडीतले फोटो शेअर करत घरींच रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन तिच्या चाहत्यांना केलं. यंदाचे वर्षी फकस्त मनातल्या मनात; जुने फोटो #socialmedia वर टाकून, घरात बसून रंगपंचमी साजरी करूया असं कॅप्शन तिने आपल्या फोटोसोबत दिले आहे. 


छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताने लकडाउन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.


प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे.

Web Title: Prajakta mali shares her throwback photoshoot