अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 07:00 IST2021-03-13T07:00:00+5:302021-03-13T07:00:02+5:30

सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.

Prajakta mali share her stylish photo on instagram | अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केले फोटो

अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केले फोटो

प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो, व्हॅकेशनचे फोटो प्राजक्ता सोशल मीडियावर पोस्ट करत असते. प्राजक्ताने स्टायलिश साडीतले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय. अजीब दास्ताँ है ये...कहाँ शुरू कहाँ ख़त्म..,ये मंज़िलें है कौनसी..ना वह समझ सके ना हम... असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.  चााहत्यांनी नेहमी प्रमाणे  तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताने लकडाउन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे.
 

Web Title: Prajakta mali share her stylish photo on instagram