Prajakta Gaikwad: साखरपुड्यानंतर प्राजक्ता-शंभुराज पंढरपुरात! जोडीने घेतलं विठुरायाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:30 IST2025-08-19T14:29:24+5:302025-08-19T14:30:30+5:30

नव्या आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वी प्राजक्ता आणि शंभुराजने जोडीने विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतलं. 

prajakta gaikwad took blessings of pandharpur vitthal rukmini with husband shambhuraj khutwad | Prajakta Gaikwad: साखरपुड्यानंतर प्राजक्ता-शंभुराज पंढरपुरात! जोडीने घेतलं विठुरायाचं दर्शन

Prajakta Gaikwad: साखरपुड्यानंतर प्राजक्ता-शंभुराज पंढरपुरात! जोडीने घेतलं विठुरायाचं दर्शन

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. नुकतंच प्राजक्ताचा साखरपुडा झाला आहे. प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभुराज खुटवड असं आहे. नव्या आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वी प्राजक्ता आणि शंभुराजने जोडीने विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतलं. 

साखरपुड्यानंतर प्राजक्ता आणि शंभुराज पंढरपुरला गेले आहेत. त्यांनी जोडीने विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतलं. विठुरायाच्या चरणी दोघेही नतमस्तक झाले. यावेळी प्राजक्ताने पिवळ्या रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केला होता. तर तिच्यासोबत शंभुराजही होते. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला प्राजक्ता आणि शंभुराज यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर प्राजक्ता खुटवड घराण्याची सून होणार आहे. शंभुराज खुटवड राजकीय घराण्याशी संबंधित आहेत. तर ते एक पैलवान असून उद्योजकही आहेत. 

Web Title: prajakta gaikwad took blessings of pandharpur vitthal rukmini with husband shambhuraj khutwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.