प्राची तेहलानच्या आईला एक्कावन मालिकेतील ही गोष्ट आवडते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 12:09 IST2017-12-07T06:39:21+5:302017-12-07T12:09:21+5:30

स्टार प्लसवरील एक्कावन मालिकेत प्राची तेहलान प्रमुख भूमिकेत आहे. प्राची अनेक वर्षं बास्केटबॉल, नेटबॉल खेळत होती. तिने या खेळांमध्ये ...

Prachi Tehelana's mother likes this thing from the series Eklavan | प्राची तेहलानच्या आईला एक्कावन मालिकेतील ही गोष्ट आवडते

प्राची तेहलानच्या आईला एक्कावन मालिकेतील ही गोष्ट आवडते

टार प्लसवरील एक्कावन मालिकेत प्राची तेहलान प्रमुख भूमिकेत आहे. प्राची अनेक वर्षं बास्केटबॉल, नेटबॉल खेळत होती. तिने या खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व देखील केले आहे. त्यामुळे फेसबुकला तिचे एक पेज असून या पेजला अनेक लोकांनी लाइक देखील केलेले आहे. हे पेज दिया और बातीच्या क्रिएटिव्ह हेट श्वेता बिश्नोईने यांनी पाहिले आणि त्यांनी प्राचीला मालिकेत काम करण्याची ऑफर दिली आणि प्राचीचा अभिनय प्रवास सुरू झाला. एक्कावन या मालिकेत खूप चांगली भूमिका साकारायला मिळाली असल्याने ती सध्या खूपच खूश आहे. या मालिकेत ती सुशील पारेख ही व्यक्तिरेखा साकारत आहे. सुशीलला लहानपणापासून चार पुरुषांनी वाढविल्यामुळे मुलींच्या कोणत्याही सवयी आणि लकबी तिच्यात नाहीयेत. या मालिकेतील नायिका ही आजच्या इतर मालिकांतील नायिकांपेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना प्राचीची व्यक्तिरेखा प्रचंड आवडत आहे. 
खऱ्या आयुष्यातही प्राचीला मुलींचे कपडे घालायलाच खूप आवडतात. ती त्याच प्रकारच्या कपड्यांमध्ये जास्त कर्म्फटेबल असते असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे ती बऱ्याचदा शर्ट आणि पॅण्टच घालते. याविषयी प्राची सांगते, या मालिकेतील सुशीलच्या स्वभावाशी माझ्या स्वभावाचे खूप साम्य असून खऱ्या आयुष्यात देखील मी टी शर्ट आणि जीन्स घालणे पसंत करते. मी खऱ्या आयुष्यात जशी आहे तशीच प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांसोबतच माझ्या आईला देखील ही मालिका खूप आवडत आहे. त्यामुळे ती ही मालिका नियमितपणे बघते. पण मालिकेत मला मुलींच्या वेशात पाहिल्यावर माझी आई अधिक खूश होते. कारण तिच्या मते सुशील ही मनाने एक मुलगीच आहे आणि तिला मुलींचे कपडे दिले आणि थोडाफार मेक-अप केला, तर ती अधिक चांगली दिसेल. सुशीलचे पुरुषीपण दूर होऊन ती मुलीसारखी झाली तर सर्वच आयांनुसार माझ्या आईलाही नक्कीच आवडेल. 
एक्कावन या मालिकेत प्राची इतर मालिकेतील नायिकांप्रमाणे सजताना, दागिने घालताना दिसत नाही. सुशील लहान असतानाच तिच्या आईचे निधन झाले आहे. त्यामुळे तिचे आजोबा, वडील, मामा आणि काका यांनीच तिचा सांभाळ केला आहे. आजवर आई आणि मुलीच्या नात्यावर अनेक मालिका बनवण्यात आल्या आहेत. या मालिकेत मुलगी आणि वडिलांचे नाते प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

Also Read : ​या कारणामुळे अभिनयक्षेत्राकडे वळलीः प्राची तेहलान

Web Title: Prachi Tehelana's mother likes this thing from the series Eklavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.