१४ वर्षांच्या संसारानंतर आयुष्यात वादळ! लोकप्रिय टीव्ही कपल जय भानुशाली-माही विज झाले विभक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:52 IST2026-01-04T13:50:54+5:302026-01-04T13:52:44+5:30
१४ वर्षांचा भरला संसार मोडला! लोकप्रिय टीव्ही अभिनेता जय भानुशालीने केली पत्नीपासून विभक्त झाल्याची घोषणा

१४ वर्षांच्या संसारानंतर आयुष्यात वादळ! लोकप्रिय टीव्ही कपल जय भानुशाली-माही विज झाले विभक्त
Jay Bhanushal Announce divorce: मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कलाकारांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यात सोशल मीडियावर टीव्हीवरील लोकप्रिय कपल जय भानुशाली आणि माही विज यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या आणि ते दोघेही घटस्फोट घेत असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. अभिनेता जय भानुशाली आणि पत्नी माही वीज यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे. १४ वर्ष संसार केल्यानंतर या जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदी टेलिव्हिजनवरील मालिका आणि रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अभिनेता जय भानुशालीने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या पत्नीपासून वेगळा झाल्याची माहिती दिली आहे. जय आणि पत्नी माही विजने लग्नानंतर १४ वर्षांनी घटस्फोट घेतला आहे. जय आणि माहीने दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, "आज आम्ही आयुष्याच्या या प्रवासात एकमेकांपासून वेगळे होत आहोत. असे असले तरी, आम्ही एकमेकांबद्दल आदर आणि सन्मान कायम ठेवू. शांतता, दया आणि माणुसकी हीच आमची नेहमी मार्गदर्शक मूल्ये राहिली आहेत. आमच्या मुलांसाठी, तारा आणि खुशी-राजवीरसाठी, आम्ही सर्वोत्तम पालक आणि सर्वोत्तम मित्र बनण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्यासाठी जे काही योग्य असेल ते करत राहू."
त्याने पुढे लिहिलंय की, "जरी आम्ही आता वेगळे होत असलो तरी, या गोष्टीत कोणतीही अस्थिरता नाही आणि या निर्णयाशी कोणतीही नकारात्मकता जोडलेली नाही. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी, कृपया या गोष्टी समजून घ्या. यापुढेही आम्ही एकमेकांचा आदर करू, एकमेकांना पाठिंबा देऊ आणि एकमेकांचे कायम मित्र राहू. त्यामुळे परस्पर संमतीने हा निर्णय घेत आम्ही पुढे जात आहोत आणि तुमच्याकडून आदर व प्रेम मिळावं अशी आमची ईच्छा आहे."
जय आणि माही विज यांनी एकाच मालिकेत मुख्य भूमिकेत काम केलं होतं. त्याचदरम्यान त्यांचे सूर जुळले. या जोडीने २०१० मध्ये लग्न केलं होतं. या जोडीला एक गोंडस मुलगी देखील आहे.