लिव्ह इन रिलेशनशिपबाबत ईशा केसकरने मांडले स्पष्ट मत; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 03:32 PM2024-02-19T15:32:21+5:302024-02-19T15:34:06+5:30

अभिनेत्री ईशा केसकर सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

Popular Marathi actress Isha Keskar opinion about live in relationship and marriage | लिव्ह इन रिलेशनशिपबाबत ईशा केसकरने मांडले स्पष्ट मत; म्हणाली...

लिव्ह इन रिलेशनशिपबाबत ईशा केसकरने मांडले स्पष्ट मत; म्हणाली...

'जय मल्हार' आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. ईशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने नुकतीच दिलेली एक मुलाखत आता चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. या मुलाखतीत ईशा लिव्ह-इन आणि लग्न यावर मोकळेपणे व्यक्त झाली.

ईशाने नुकतेच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी लग्न आणि लिव्ह ईन रिलेशनशिपबद्दल बोलताना ती म्हणाली, 'तुम्हाला जे योग्य वाटेल आणि पटेल तेच करावं. तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर ते करावं किंवा जर तुम्हाला आणखी नात्यात स्पष्टता हवी, असेल तर मग जोडीदाराशी बोलून मार्ग काढावा. थोडक्यात काय तर तुम्हाला आयुष्यभरासाठी एक सवंगडी मिळत आहे. योग्य वाटतं असेल तर त्याच्यासोबत तुम्ही लिव्ह इनमध्ये राहू शकता आणि मग लग्न करायचं की नाही निर्णय घेऊ शकतो'

ती म्हणाली, 'लिव्ह इनच्या पण काही चांगले आणि वाईट बाजू आहेत.  लिव्ह इनमध्ये असताना घर घेण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी अडचणी येतात. तसेच जर मुलं झालं तर त्याला वडिलांचं नाव देण्यासाठी, शाळेत भरती करताना समस्या निर्माण होतात. त्यामुळे लग्न गरजेचं आहे. कायदेशीर सर्व बरं पडतं.लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठीजर जोडपं सक्षम असेल तर त्यांना कुणाच्या परवानगीची गरज आहे, असं मला वाटतं नाही. जर नातं चांगलं आहे तर काही फरक पडणार नाही. प्रत्येकाने आपल्या-आपल्या हिशोबाने निर्णय घ्यायला हवा.'

पुढे ती म्हणाली, ' मी लिव्ह इनचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे तेही एवढं वाईट नाही. जर तुमचा जोडिदार समजदार असेल तर त्यात काही अडचणी येणार नाही. तसेच लग्नाबद्दल मते बदलल्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप वाढतं आहे. लग्न आवडतं तर काहींना लिव्ह इन रिलेशनशिप आवडतं. लग्न हेचं छान आहे किंवा लिव्ह इनचं छान आहे असे आपण म्हणू शकत नाही. ज्याच्या त्याच्या सोयीन वाटेल तसं करावं. यात इतरांनी लुडबुड करु नये कारण, हा फारच वैयक्तिक बाब आहे'.

सध्या ईशा स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ईशा आपल्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले आहेत.  उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर इशाने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं.  त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

Web Title: Popular Marathi actress Isha Keskar opinion about live in relationship and marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.