पोपटलालने घेतली इरफानची मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 17:19 IST2016-07-11T11:49:26+5:302016-07-11T17:19:26+5:30

इरफान खान सध्या मदारी या त्याच्या आगामी चित्रपटाचे विविध मालिकांमध्ये आणि रिअॅलिटी शोमध्ये प्रमोशन करत आहे. प्रमोशनसाठी तो नुकताच ...

PopatlaLa interviewed Irfan | पोपटलालने घेतली इरफानची मुलाखत

पोपटलालने घेतली इरफानची मुलाखत

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">इरफान खान सध्या मदारी या त्याच्या आगामी चित्रपटाचे विविध मालिकांमध्ये आणि रिअॅलिटी शोमध्ये प्रमोशन करत आहे. प्रमोशनसाठी तो नुकताच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवर पोहोचला होता. त्याने पोपटलाल आणि भिडे यांच्यासोबत मालिकेचे चित्रीकरण केले. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत पोपटलाल पत्रकाराच्या भूमिकेत आहे. मदारीच्या निमित्ताने तो इरफान खानची मुलाखत घेत असल्याचे प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. पोपटलाल इरफानची मुलाखत घ्यायला चालला आहे हे भिडेला कळल्यावर भिडेही त्याच्यासोबत जाणार आहे. पोपटलाल आणि भिडे इरफानला भेटून त्याची मुलाखत तर घेणार आहे. पण त्याचसोबत सेल्फीही काढणार आहे. इरफानने बॉलिवुडमध्येच नव्हे तर हॉलिवुडमध्येही आपले नाव कमावले आहे. अशा अभिनेत्याला भेटून खूपच आनंद झाला असे या मालिकेत भिडेची भूमिका साकारणारा मंदार चांदवडकर सांगतो. 

Web Title: PopatlaLa interviewed Irfan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.