तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत पोपटलालला लागली तब्बल एक करोडची लॉटरी, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 06:30 IST2018-10-27T15:02:10+5:302018-10-29T06:30:00+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील पोपटलाल तर प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांच्या या लाडक्या पोपटलालला लॉटरी लागणार आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत पोपटलालला लागली तब्बल एक करोडची लॉटरी, पण...
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका, या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेत प्रेक्षकांना नेहमीच धमाल मस्ती पाहायला मिळते. या मालिकेतील पोपटलाल तर प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांच्या या लाडक्या पोपटलालला लॉटरी लागणार आहे. या मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे की, पोपटलालला पैशांची गरज असल्याने तो भिडेकडून दोन हजार रुपये उसने घेणार आहे आणि हे पैसे परत करण्यासाठी तो एटीएममधून पैसे काढायला जाणार आहे. पण तिथून परतत असताना एक अतिशय गरीब कुटुंब त्याला दिसणार आहे. या कुटंबाला पैशांची खूप गरज आहे हे पोपटलालच्या लक्षात आल्याने तो त्याच्या खिशातले पाच हजार रुपये त्यांना देणार आहे.
पोपटलालने आपल्यावर खूप मोठे उपकार केल्याची जाणीव त्या गरीब कुटुंबाला असल्याने ते आपल्याकडे असलेले लॉटरीचे तिकीट पोपटलालला देणार आहेत. पोपटलाल गोकुळधाम सोसायटीमध्ये परतल्यानंतर हे तिकीट गोकुळधामधील त्याच्या मित्रांना दाखवणार आहे. या लॉटरीचा नंबर पाहिल्यानंतर भिडेचा मोबाईल नंबर आणि या लॉटरीचा नंबर सारखाच असल्याचे सगळ्यांच्या लक्षात येणार आहे. ही चर्चा झाल्यानंतर पोपटलाल त्याचे हे लॉटरीचे तिकीट खिशात ठेवणार आहे. पण भिडेच्या हातून पोपटलालच्या शर्टवर सोडा पडणार आहे. त्यामुळे पोपटलाल आपला शर्ट धुण्यासाठी देणार आहे. पण हा शर्ट धुण्यासाठी देताना या शर्टात लॉटरीचे तिकीट असल्याचा त्याला विसर पडणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी भिडेला वर्तमानपत्र वाचताना लक्षात येणार आहे की, पोपटलालला एक करोडची लॉटरी लागली आहे. त्यामुळे भिडे पोपटलालला उठवून ही खुशखबर देणार आहे. पण ही बातमी कळल्यानंतर पोपटलालकडून लॉटरीचे तिकीट हरवले असल्याचे पोपटलाल आणि भिडेला कळणार आहे. आता पोपटलालला हे तिकीट मिळणार की हे तिकीट त्याच्या कपड्यांसोबत धुतले जाणार आणि त्याचे करोडपती होण्याचे स्वप्न अपूर्ण राहाणार हे प्रेक्षकांना तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या आगामी भागांमध्येच कळणार आहे.