घरातूनच मिळाले अभिनयाचे धडे, पूर्वा गोखलेची आईदेखील आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 16:42 IST2023-11-09T16:41:42+5:302023-11-09T16:42:22+5:30

सध्या पूर्वाची आई तुझेच गीत गात आहे मालिकेत भूमिका करतायेत.

Poorva gokhale mother kanchan gokhale also an actress | घरातूनच मिळाले अभिनयाचे धडे, पूर्वा गोखलेची आईदेखील आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री

घरातूनच मिळाले अभिनयाचे धडे, पूर्वा गोखलेची आईदेखील आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री

पूर्वा गोखलेने मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने कोई दिल में है, कहानी घर घर की यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिची कुलवधू या मराठी मालिकेतील भूमिका चांगलीच गाजली होती. पूर्वाने मराठी चित्रपटासृष्टीत तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, तिची आईदेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. 

 अभिनेत्री पूर्वा गोखलेला अभिनयाचं बाळकडू तिच्या आईकडूनच मिळालं आहे. पूर्वा गोखलेच्या आईने अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांचं नाव कांचन गुप्ते आहे. कांचन गुप्ते यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी नाटकांप्रमाणेच काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्यांनी जावई विकत घेणे आहे, घाडगे अँड सून, माझी नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सध्या त्या तुझेच गीत गात आहे मालिकेत काम करत आहेत. 

पूर्वा गोखलेचे लग्न केदार गोखले यांच्यासोबत झाले असून ते बिझनेसमन आहेत. पूर्वा स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत देखील झळकली होती. या मालिकेत तिने साकारलेली राणी सईबाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. कुलवधू या मालिकेत देखील ती झळकली होती. 

Web Title: Poorva gokhale mother kanchan gokhale also an actress