पूजा भटने बिग बॉसच्या घरात भट कुटुंबाबाबत केला धक्कादायक खुलासा, म्हणाली - मी आणि माझे वडील...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 16:49 IST2023-07-19T16:48:55+5:302023-07-19T16:49:25+5:30
Pooja Bhatt : अभिनेत्री पूजा भटने पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात नवीन खुलासा केला आहे.

पूजा भटने बिग बॉसच्या घरात भट कुटुंबाबाबत केला धक्कादायक खुलासा, म्हणाली - मी आणि माझे वडील...
अभिनेत्री-दिग्दर्शिका आणि निर्माती पूजा भट (Pooja Bhatt) बिग बॉस ओटीटी सीझन २ (Bigg Boss OTT 2)च्या प्रीमियरच्या दिवसापासून प्रसिद्धीच्या झोतात आहे. पूजा भटने आतापर्यंत बिग बॉसमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या शालेय शिक्षणाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. पूजा भट म्हणते की ती आणि तिचे वडील स्कूल ड्रॉपआउट आहेत.
बिग बॉस ओटीटी सीझन २च्या ताज्या एपिसोडमध्ये, पूजा भटने एक अतिशय धक्कादायक खुलासा केला आणि म्हटले की पदवीधर लोकांचे शिक्षण आणि क्षमता दर्शवते हे आवश्यक नाही. पूजा भटने असेही सांगितले की ती आणि तिचे वडील शाळेत नापास झाले आहेत. यावरुन हे दर्शवते की पदवी आणि शिक्षणाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. मग पूजा भट सांगते की तिची इंग्रजीवर चांगली पकड आहे कारण ती पारशी शाळेत शिकली आहे.
बिग बॉस ओटीटी सीझन २ मध्ये एकीकडे टीव्ही सेलेब्स तर दुसरीकडे सोशल मीडियावरील प्रसिद्ध लोकांचा ग्रुप झाल्याचे दिसत आहे. फलक नाझ, अविनाश सचदेव आणि जिया शंकर त्यांच्या चर्चेत तल्लीन राहतात, तर अभिषेक मल्हान, एल्विश यादव, मनीषा राणी यांनी सलमान खानच्या रिअॅलिटी शोच्या मनोरंजनाचा भाग वाढवला आहे. बिग बॉस ओटीटी सीझन २चा प्रीमियर १७ जून रोजी झाला. शोमध्ये आतापर्यंत दोन वाइल्ड कार्ड एंट्री करण्यात आल्या असून लवकरच एका नवीन यूट्यूबरला वाइल्ड कार्ड म्हणून शोमध्ये एंट्री दिली जाईल असे बोलले जात आहे.