पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्माने केला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 12:02 IST2017-08-18T06:32:38+5:302017-08-18T12:02:38+5:30
पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्माने नुकताच साखरपुडा केला असून अदा खान, अंकित गेरा, अनिता हंसनंदानी, सुरभी ज्योती, शशांक व्यास, पूजा गौर, भारती सिंग आणि मनिष पॉल यांसारखे छोट्या पडद्यावरचे सेलिब्रिटी त्यांच्या साखरपुड्याला उपस्थित होते.

पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्माने केला साखरपुडा
द वों के देव महादेव या मालिकेतील पार्वतीच्या भूमिकेमुळे अभिनेत्री पूजा बॅनर्जी चर्चेत आली. या मालिकेनंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. केवळ काहीच वर्षांच्या कारकिर्दीत पूजाने तिचे एक वेगळे प्रस्थ छोट्या पडद्यावर निर्माण केले आहे. आता तिच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पूजाने नुकताच साखरपुडा केला असून ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
पूजाने नुकताच कुणाल वर्मासोबत साखरपुडा केला. कुणाल हा छोट्या पडद्यावरचा अभिनेता आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पूजा आणि कुणाल हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत नात्यात आहे. त्यांनी आता नऊ वर्षांच्या नात्यानंतर साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणाल आणि पूजाची पहिली भेट तुझ संग प्रीत या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान झाली होती. काहीच महिन्यात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या नात्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून मीडियात सुरू आहे.
पूजा आणि कुणालने त्यांच्या जवळच्या नातलगांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत साखरपुडा केला. छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार त्यांच्या साखरपुड्याला उपस्थित होते. अदा खान, अंकित गेरा, अनिता हंसनंदानी, सुरभी ज्योती, शशांक व्यास, पूजा गौर, भारती सिंग आणि मनिष पॉल या तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी वेळात वेळ काढून त्यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली.
साखरपुड्याचे काही फोटो आणि व्हिडिओ पूजाने तिच्या इन्स्टाग्राम व्हिडिओला पोस्ट केले असून ते चांगलेच व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये पूजा आणि कुणाल यांनी अनेक गाण्यांवर ताल धरला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
पूजा आणि कुणाल लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
![pooja Banerjee and kunal verma]()