पराग नव्हे किश्वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 11:32 IST2016-10-04T06:02:47+5:302016-10-04T11:32:47+5:30
ब्रम्हराक्षस-जाग उठा शैतान या मालिकेत पराग त्यागी प्रेक्षकांना ब्रम्हराक्षस या प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतो. या मालिकेच्या कथानकाला सध्या नवनवीन ...

पराग नव्हे किश्वर
ब रम्हराक्षस-जाग उठा शैतान या मालिकेत पराग त्यागी प्रेक्षकांना ब्रम्हराक्षस या प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतो. या मालिकेच्या कथानकाला सध्या नवनवीन कलाटण्या दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार आहे. ब्रम्हराक्षसचा मृत्यू झाल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. त्याच्या मृत्यूनंतर किश्वर मर्चंट ब्रम्हराक्षसच्या भूमिकेत दिसणार आहे. आता मालिकेत किश्वर दुहेरी भूमिका साकारणार आहे. यासाठी ती सध्या खूपच उत्सुक आहे. किश्वर सांगते, "प्यार की ये एक कहानी या मालिकेत मी नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यामुळे खलनायिकेची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी कठीण नाहीये. पण लोकांना घाबरवण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.. पण परागला अभिनय करताना मी पाहिले आहे. त्याचा उपयोग मला ही भूमिका साकारताना नक्कीच होईल. तो शरीराने खूप बलाढ्य आहे तर मी खूप नाजूक आहे. त्यामुळे हा फरक लोकांना नक्कीच जाणवेल. यासाठी आम्ही माझ्या लुकवर अधिक मेहनत घेणार आहोत. माझा लुक काय असणार यावर आमचा विचार सुरू आहे."
![]()