कविता म्हणतेय मी पालकांच्या विरोधात जाणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 17:42 IST2016-05-26T12:12:01+5:302016-05-26T17:42:01+5:30
एफआयआर या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री कविता कौशिक आणि अभिनेता नवाब शाह हे दोघं नात्यात असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा ...

कविता म्हणतेय मी पालकांच्या विरोधात जाणार नाही
ए आयआर या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री कविता कौशिक आणि अभिनेता नवाब शाह हे दोघं नात्यात असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. नवाबने दिलवाले या चित्रपटात काम केले होते. कविता आणि नवाबच्या नात्याला कविताच्या घरातून जोरदार विरोध आहे. त्यामुळे कविता त्यांच्या नात्याबद्दल बोलणे टाळते अशी चर्चा आहे. कविता आणि नवाब यांचे धर्म वेगवेगळे असल्याने कविताच्या घरातल्यांनी या नात्याला विरोध केला असल्याचे म्हटले जात आहे. कविताने आपल्या पालकांच्या विरोधात जाऊन कोणताही निर्णय न घेण्याचे ठरवले असल्याचे म्हटले जाते.काहीही झाले तरी पालकांना दुखवायचे नाही असे कविताचे म्हणणे असल्याचे म्हटले जात आहे.