​कविता लाड सांगतेय, संकल्प करण्यासाठी नवीन वर्षाची वाट कशाला पाहायची

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 16:19 IST2017-12-29T10:49:47+5:302017-12-29T16:19:47+5:30

नववर्षं जवळ आले की, नववर्षात कोणते संकल्प करायचे याचा विचार कित्येक दिवसांपासून सुरू होतो. काही जण वजन कमी करण्याचा ...

Poet Laad says, I want to see what New Year's journey is for resolving | ​कविता लाड सांगतेय, संकल्प करण्यासाठी नवीन वर्षाची वाट कशाला पाहायची

​कविता लाड सांगतेय, संकल्प करण्यासाठी नवीन वर्षाची वाट कशाला पाहायची

वर्षं जवळ आले की, नववर्षात कोणते संकल्प करायचे याचा विचार कित्येक दिवसांपासून सुरू होतो. काही जण वजन कमी करण्याचा संकल्प करतात तर काही जण रोज सकाळी उठण्याचा संकल्प करतात. प्रत्येकाचे संकल्प हे वेगवेगळे असतात. हे संकल्प किती दिवस सातत्याने पूर्ण केले जातात हे केवळ त्या व्यक्तीलाच ठाऊक. पण नववर्ष आणि संकल्प हे एक समीकरणच बनले आहे.
राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेत सध्या कविता लाड माधुरी देशमुख ही भूमिका साकारत आहे. तिच्या या मालिकेला आणि भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेद्वारे कविताने जवळजवळ दीड वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केला आहे. त्यामुळे २०१७ वर्षं हे तिच्यासाठी खूपच खास होते असे ती सांगते. २०१७ वर्षं कसे गेले असे विचारले असता कविता सांगते, राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेद्वारे मी जवळजवळ दीड वर्षांनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आले. या मालिकेतील माझी भूमिका खूपच वेगळी आहे. माधुरी देशमुख स्वतंत्र विचार करणारी स्त्री आहे, ती करारी आहे. तसेच ती खंबीर आहे. अशा वेगळ्या प्रकारची भूमिका या वर्षांत मला साकारायला मिळाली याचा मला आनंद होत आहे. आता नव वर्षं जवळ येत असल्याने नव वर्षात तुमचे संकल्प काय असणार असे अनेक जण मला विचारत आहेत. पण माझ्या मते तरी संकल्प करण्यासाठी नवीन वर्षाची वाट पाहाण्याची गरजच नाही.
कविताने अनेक वर्षांपूर्वी चार दिवस सासूचे या मालिकेत काम केले होते. ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील कविता लाडची व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. कविता दोन वर्षांपूर्वी तुझ्यावाचून करमेना या मालिकेत देखील झळकली होती. या आधी तिने तुझ्या वाचून करमेना, आळीमिळी गुपचिळी, काय पाहिलंस माझ्यात यांसारख्या मराठी तर चंद्रकांत चिपळूणकर सीडी बम्बावाला या हिंदी मालिकेत काम केले आहे. कविताने सुंदर मी होणार या नाटकापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. एका लग्नाची गोष्ट, चार दिवस प्रेमाचे अशी तिची अनेक नाटकं गाजली. तिने लपून छपून, तू तिथे मी यांसारख्या चित्रपटात देखील काम केले आहे. 

Also Read : राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतील माधुरी म्हणजेच कविता लाडने शेअर केली त्यांच्या नवऱ्याविषयी काही गुपिते

Web Title: Poet Laad says, I want to see what New Year's journey is for resolving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.