हरभजन सिंग टॉक शोद्वारे घेणार खेळाडूंची फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 16:17 IST2018-05-08T10:47:00+5:302018-05-08T16:17:00+5:30

भारतभरातील क्रिकेटप्रेमींना आनंद देण्यासाठी, माहिती तंत्रज्ञानातील सुरक्षा आणि उपाय पुरवणाऱ्या क्वीकहील आणि भारतीय क्रिकेटचा एक्का असलेल्या हरभजन सिंग यांनी, ...

Players from Harbhajan Singh will be seen in a talk show | हरभजन सिंग टॉक शोद्वारे घेणार खेळाडूंची फिरकी

हरभजन सिंग टॉक शोद्वारे घेणार खेळाडूंची फिरकी

रतभरातील क्रिकेटप्रेमींना आनंद देण्यासाठी, माहिती तंत्रज्ञानातील सुरक्षा आणि उपाय पुरवणाऱ्या क्वीकहील आणि भारतीय क्रिकेटचा एक्का असलेल्या हरभजन सिंग यांनी, ‘क्वीकहील भज्जी ब्लास्ट विथ सीएसके’ या एका अनोख्या साप्ताहिक गप्पांच्या कार्यक्रमाची घोषणा केली. भारतातील तसेच परदेशातील नावाजलेले क्रिकेक खेळाडू यात सहभाग नोंदवणार आहेत. दहा भागांचा दर आठवड्यातून एकदा प्रसारित होणारा हा गप्पांचा कार्यक्रम पहिल्यांदा यूट्यूब वरील युवा प्रेक्षकांचे डिजिटल मनोरंजनाचे व्यासपीठ असलेल्या क्यूयू प्लेवरून प्रसारीत होईल.

‘क्वीक हील भज्जी ब्लास्ट विथ सीएसके’ या कार्यक्रमाचे नावीन्यपूर्ण स्वरूप या कार्यक्रमाला इतरांपेक्षा वेगळे ठरवते. क्रिकेट सामन्याच्या दिवशी, ड्रेसिंग रूममधील वातावरण खेळीमेळीचे ठेवणे, तसेच 20-25 मिनिटांसाठी का होईना मजामस्तीचे मोहोल तयार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या गप्पांच्या कार्यक्रमात एकमेवाद्वीतीय हरभजन ज्याला त्याचे सहकारी प्रेमाने ‘भज्जी पा’ असे संबोधतात तो आपल्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील सहकाऱ्यांशी मोकळ्या-ढाकळ्या गप्पा मारणार आहे, या गप्पांमध्ये  क्रिकेटपासून, वैयक्तिक आयुष्यातली मते, काही किस्से, आठवणी अशा विविधांगी विषयांवर चर्चा रंगणार आहे. रॅपिड फायर, रॅप बॅटल, मते आणि कोण काय म्हणाले अशा भागांमध्ये कार्यक्रमाची विभागणी केलेली असून त्यातून पडद्यामागील गुपिते बाहेर येणार आहेत, तर त्यासोबत थोडे शहाणपणाचे डोसही दिले जाणार आहेत. आपल्या आवडत्या क्रिकेट खेळाडूंसोबत संवादाची मेजवानी आणि अशा हलक्या फुलक्या रंजक चर्चेने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन होईल याची काळजी घेण्यात आली आहे.

हरभजन सिंग म्हणाला, “ वास्तविक पाहता आणि अर्थात हे सत्यही आहे, तुम्ही ज्यांना भेटता अशा व्यक्तींपैकी खेळाडू म्हणजे सर्वाधिक मिष्कील आणि संदर्भहीन माणसे असण्याशी शक्यता अधिक असते. खेळाडूंच्या आपापसातील मोकळ्या चर्चेचे फलित म्हणजे एकमेकांच्या खोड्या काढणे किंवा शहाणपणाचे डोस एकमेकांना पाजणे असे दिसून येते. आतापर्यंत न पाहिलेले हे वास्तव मला ‘क्वीक हील भज्जी ब्लास्ट विथ सीएसके’ या कार्यक्रमातून भारतीय प्रेक्षकांसमोर मांडायचे आहे. या टॉक शोमध्ये पडद्यामागच्या करामती आणि ड्रेसिंग रूममधील सीनची झलक पाहायला मिळणार असल्याने, ही भारतातील आणि भारताबाहेरील क्रिकेटप्रेमींना एक पर्वणीच असणार आहे. क्रिकेटरसिकांचे आदर्श खेळाडू त्यांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी या चर्चेमुळे त्यांना मिळणार आहे.”

कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या भागात, तडाखेबाज अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना कार्यक्रमात येणारा पहिला पाहुणा खेळाडू असणार आहे. हा भाग 8 मे 2018 रोजी लाइव्ह प्रसारीत होणार आहे. यानंतर ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, मायकल हसी, शेन वॉटसन आणि इमरान ताहीर यांच्यासारखे आणखी काही आघाडीचे खेळाडू पुढील भागांमध्ये सहभागी होणार आहेत. कार्यक्रम प्रसारित होण्यापूर्वीच कार्यक्रमाला नावाजलेले अनुभवी खेळाडू सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, विराट कोहली आणि शिखर धवन यांच्या सारख्यांनी प्रभावी दाद दिली आहे

Web Title: Players from Harbhajan Singh will be seen in a talk show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.